ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाबत नागपुरात नेमकं काय घडलं?, मनीषा कायंदे यांनी का केला निषेध

कोणती माणसं आली होती, त्यांची नावं माहिती नाहीत. पण, त्यांनी महिलांना दमदाटी केली.

ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाबत नागपुरात नेमकं काय घडलं?, मनीषा कायंदे यांनी का केला निषेध
मनीषा कायंदे
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 5:22 PM

नागपूर : येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कायंदे म्हणाल्या, नागपुरात अधिवेशनादरम्यान प्रत्येक पक्षाला एक कार्यालय दिले जाते. आम्ही कार्यालयाचा उपयोग करतो. बाळासाहेबांची शिवसेना म्हणणाऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून महिलांना दमदाटी केली. आमच्या दोन महिला कर्मचारी या वयाच्या २० व्या वर्षापासून तिथं काम करत आहेत. गेली तीस वर्षे त्या नागपूरला येत आहेत. आधीचं येऊन कार्यालयाची स्थापना करावी लागते. कालपासून कार्यालय स्थापन केलं. कामकाज सुरू केल्यानंतर गावगुंडांसारखं दम देण्यात आलं. तुम्ही कधी येथून निघता, अशी दमदाटी करण्यात आल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला.

दमटादी करण्यात आलेल्या त्या महिलांना अश्रू अनावर झाले. अध्यक्षांच्या आदेशानं आम्हाला हे कार्यालयाच्या सहा खोल्या मिळाल्यात. कुणाला कुठलं कार्यालय मिळावं, हा अध्यक्षांचा निर्णय आहे. महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं. हे कितपत योग्य आहे, असा सवाल मनीषा कायंदे यांनी विचारला.

महिलांना दमदाटी करणं, हीच का बाळासाहेबांची शिकवण, हीच का संस्कृती असा टोला शिंदे गटाला लगावला. यांच्या एका मंत्र्यानं एका महिला खासदाराला अत्यंत घाणेरडी शिवी दिली. त्यांचेचं अनुकरण त्यांचे काही कार्यकर्ते करतात. याचा मी निषेध करत असल्याचंही मनीषा कायंदे म्हणाल्या.

विधानभवनाच्या वास्तूला पवित्र वास्तू मानतो. परंतु, येथील कार्यालयात महिलांना दमदाटी होते. खरं तर महिला कर्मचाऱ्यांचा याच्याशी काहीही देणंघेणं नाही. पक्षप्रमुखांना याबाबत अवगत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोणती माणसं आली होती, त्यांची नावं माहिती नाहीत. पण, त्यांनी महिलांना दमदाटी केली. अत्यंत वाईट पद्धतीनं बोलल्यानं महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, याचा उहापोह मी सभागृहात करणारचं आहे. पण, कर्मचारी महिलांवर अशी वेळ यावी, हे दुर्दैवाचं असल्याचंही कायंदे म्हणाल्यात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.