Video : Nagpur Fire | नागपूर शहरात पाच ठिकाणी आग, मोठ्या प्रमाणात नुकसान, आग लागण्याचे कारण काय?

नागपूर शहरात एकाच दिवशी पाच आगीच्या घटना घडल्या. त्यामुळं या आगी का लागल्या. याची कारणे वेगवेगळी असली, तरी शंकेला वाव आहे. आग विझविण्याचे आवाहन अग्निशमन विभागापुढं होते. त्यामुळं त्यांची चांगलीच कसरत झाली.

Video : Nagpur Fire | नागपूर शहरात पाच ठिकाणी आग, मोठ्या प्रमाणात नुकसान, आग लागण्याचे कारण काय?
नागपूरच्या यशोधरानगर परिसरात शुक्रवारी लागलेली आग.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 9:32 AM

नागपूर : यशोधरानगर परिसरातील लाकडाच्या कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात लाकडाचे (Timber Factory) दरवाजे तसेच भुसा आणि केमिकलपासून दरवाजे तसेच फ्रेम बनविल्या जात होत्या. लाकूड असल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. मात्र फायर ब्रिगेडचे (Fire Brigade) जवान आणि पोलिसांनी या ठिकाणी पोहचत काम सुरू केलं. 9 फायरच्या गाड्यांच्या माध्यमातून आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आग सतत भडकत होती. त्यामुळे आजूबाजूला धोका वाढला होता. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शेवटी आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती फायर ऑफिसर ए. चंदनखेडे (Officer A. Chandankhede) यांनी दिली.

पोलीस क्वार्टरचा पाचवा मजला

नागपूर शहरातली ही आग लागण्याची एकच घटना नव्हे, तर इतर पाच ठिकाणी अशा आगी लागल्या. पोलीस क्वॉर्टरच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शुक्रवारी पहाटे आग लागली. लगेचच आगीचे लोळ सर्वत्र पसरले. अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. तीन बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यात ढोबळे यांच्या फ्लॅटमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तिसरी घटना अजनी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोरील आशा मेडिकल स्टोअर्सला आग लागली. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

छतावरील स्टोअर रूमला आग

चौथी घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास इतवारी भागातील नमकगंज येथे घडली. तुळशीराम उमरेडकर यांच्या छतावरील स्टोअर रूमला आग लागली. आगीने जवळच्याच आत्माराम टॉवर इमारतीलाही आवाक्यात घेतले. या भीषण आगीमुळे गर्दी जमली होती. या घटनेत डॉ. श्याम छाडी यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच या ठिकाणी गंजीपेठ व सिव्हील लाईन येथील अग्निशमन केंद्रातील चार गाड्या रवाना करण्यात आल्या. पाचवी घटना, सायंकाळी सहाच्या सुमारास कांजी हाऊस येथील आरामशीनला शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुसान झाले.

पाहा व्हिडिओ

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

Video – नागपूर सीमेलगतच्या गावात शिरले अस्वल; रात्रीच्या अंधारात शिकारीचा बेत?, वनविभागाची शोधमोहीम

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.