Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? नितीन गडकरींनी सांगितली तारीख, टुरिझमला होणार फायदा

नितीन गडकरींचा आणखी एक नवा प्रयोग करणार आहेत. 16 मार्च रोजी ते आता ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च करणार आहेत. याची माहिती त्यांनी आज नागपुरात दिली.

ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? नितीन गडकरींनी सांगितली तारीख, टुरिझमला होणार फायदा
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 4:14 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले, पाण्यातून ग्रीन हायड्रोजन निर्माण केलं जाईल. त्यात विदर्भ हा सेंटर असेल. टुरिझम वाढविण्यासाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्या (Electric Trains for Safari) वापरल्या जातील. त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही. त्यामुळे गाड्या वाढतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वाढेल. त्यातून रोजगारसुद्धा निर्मिती होईल. संपूर्ण विदर्भात औद्योगिक विकासाच चित्र तयार होण्यासाठी हा औद्योगिक महोत्सव घेतला जात आहे. त्याचा मोठा फायदा होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं. नितीन गडकरींचा आणखी एक नवा प्रयोग करणार आहेत. 16 मार्च रोजी ते आता ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च (Green hydrogen car launch) करणार आहेत. याची माहिती त्यांनी आज नागपुरात दिली.

रोजगार उपलब्ध झाला पाहिजे

विदर्भाचा विकास आमचा अजेंडा आहे. विदर्भासोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत देशाचा विकास होईल. हायट्रोजनवर जगात रेल्वे चालली. काही देशात कार चालत आहे. आता देशातील हायट्रोजनवर पहिली कार दिल्लीत चालणार आहे. विजेच्या बास्केटमध्ये 33 टक्के सोलर आहे. आता प्रत्येक उद्योगाने आपलं सोलर लावायचं. पण त्याला राज्यसरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळाले नाही. आता 38 टक्के सोलरवर आलं. कोणाचा रोजगार जाता कामा नये आणि सुधारही झाला पाहिजे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

भंडारा, गोंदियात मॅग्निजचे साठे

रोजगार वाढविण्यासाठी पुढील दहा वर्षांचा विचार करावा लागेल. त्यानुसार योजना बनवाव्या लागतील. त्यामधून उद्योग येतील आणि रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्रातील 75 टक्के मिनरल्स विदर्भात आहेत. 80 टक्के जंगल विदर्भात आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्टील इंडस्ट्रीची मोठी शक्यता आहे. देशात 55 लाख टन मॅग्निजची गरज आहे. पण, देशात फक्त 25 लाख टन मॅग्निज तयार होतो. त्यामुळं 30 लाख टन मॅग्निज परदेशातून आयात करावा लागतो. भंडारा, गोंदिया, बालाघाटमध्ये मॅग्निज उपलब्ध आहे. अॅल्युमिनीअयमवर संशोधन करणारे संस्था नागपूरमध्ये असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.