Video – संजय राऊतांचा नारायण राणेंवर आरोप, मुख्यमंत्री केव्हा मौन सोडणार?, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप केलेत. आमचे काही साथीदार बेपत्ता आहेत, असं ते म्हणाले. यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण द्यावे, असं भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Video - संजय राऊतांचा नारायण राणेंवर आरोप, मुख्यमंत्री केव्हा मौन सोडणार?, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
नागपुरात बोलताना प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:20 PM

नागपूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे. सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर त्यांचे अनेक सहकारी बेपत्ता असल्या संदर्भात आरोप केलाय. तसेच नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भातील खरी परिस्थिती लोकांसमोर मांडावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अनिल देशमुख व्हावेत, माफीचे साक्षीदार

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्याचे प्रकरण असोत किंवा शंभर कोटी रुपये वसुलीचे प्रकरण. सचिन वाजे मुख्य आरोपी असल्यामुळे माफीचे साक्षीदार होऊ शकत नाही. त्याऐवजी या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखच माफीचा साक्षीदार झाले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. याप्रकरणी राज्य आणि केंद्रातल्या तपास एजन्सीज नीट तपास करत नाहीत. तसेच प्रकरण न्यायाधीशांसमोर असल्यामुळे आता त्याचा नीट तपास व्हावं आणि सत्य समोर यावं ही जबाबदारी न्यायाधीशांची आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस प्रस्ताव स्वीकारेल का

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

पाहा व्हिडीओ

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?

Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.