Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यातील उद्याने, बगीचे केव्हा सुरू होणार?, जिल्हाधिकारी विमला यांनी दिली माहिती

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा उद्देश नागरिकांच्या समस्या, निवेदन व तक्रारीचे निराकरण करण्याचा आहे. ग्राहकांच्या अधिकाराचे रक्षण करुन त्यांच्या तक्रारींना प्राधान्य द्या. तक्रारींचे तत्काळ निवारण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यातील उद्याने, बगीचे केव्हा सुरू होणार?, जिल्हाधिकारी विमला यांनी दिली माहिती
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:06 AM

नागपूर : सामान्य जनतेस त्रास होईल, अशा कोणत्याही प्रकारास प्रतिबंध घाला. टपरीवरील खाद्यपदार्थाची कडक चौकशी करा. खाद्यतेलाचा दर्जा उत्तम राहील यावर अधिक लक्ष ठेवून तपासणीवर भर द्या. शिधापत्रिकेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य गटातील लाभ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला (District Collector Vimala) यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद (Consumer Protection Council) वेबिनारद्वारे घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे, सहायक पुरवठा अधिकारी मृदुला मोरे, सहायक आयुक्त अन्न प्रशासनाचे अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अमित कराड, शिक्षण विस्तार अधिकारी एच. बी. कुमरे, व्ही. पी. बनाफर, एन. पी. जोशी, व्ही. पी. जोशी जिल्हाधिकारी कार्यालयात तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मो. शाहिद शरीफ व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

उद्याने, बगीचे लवकरच सुरू होतील

कोरोनाचा प्रादुर्भाव नाहीसा झालेला आहे. अशाही परिस्थितीत वृध्द व वयोवृध्द नागरिकांना घरातच राहावे लागते. त्यामुळे आरोग्यविषयक व्यायाम व योगासाठी नागूपर येथील उद्याने व बगीचे सुरू करावे. अशा सूचना अशासकीय सदस्यांनी केली. कोरोना नाहीसा झाला नसून, कमी झालेला आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच उद्याने व बगीचे यावरील बंदी उठविण्यात येईल, असे आर. विमला यांनी सांगितले.

आरटीईच्या रिक्त जागांची नोटीस बोर्डवर द्यावी

ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. टपरीवरील खाद्य पदार्थ, सर्व प्रकारच्या मिठाई, बेकरी पदार्थांचे डिटेक्शन, सर्व शाळांमध्ये आरटीईमधील रिक्त जागांची नोटीस बोर्डवर प्रसिध्दी देण्यात यावी. नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य, स्कूल बसचे अनियंत्रित भाडेवाढ या दरांबाबत चर्चा करण्यात आली. वीज संबंधित नियम व अटी फलक दर्शनी भागात लावणे, मास्क, सॅनिटायझर यांचे वेगवेगळ्या दराबाबत चर्चा करण्यात आली.

खाद्यतेलासाठी दहा ठिकाणी धाडी

मास्कचे दर वेगवेगळे असल्याचे सदस्यांनी सांगितले. स्कुलबसमध्ये महिला नेमणूक करुन अवाजवी भाडेवाढीबाबत परिवहन समिती समोर प्रकरण ठेवण्याचे सदस्यांनी मान्य केले. वीज भरणा केंद्रावर नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे महावितरणच्या प्रतिनिधींना सांगितले. आरटीईबाबत पोर्टलवर माहिती उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत खाद्यतेल रिपॉकरवर 10 धाडी घालून कार्यवाही करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी, इच्छुकांचा सोशल मीडियावर धुमाकूळ, हवा कशी तयार होणार?

Melghat Fire | जंगल मे फायर नही, फ्लावर होणे चाहिये!, समाजमाध्यमांवरील पोस्टरने वेधले लक्ष; दंड काय होणार माहीत आहे का?

Video – Nagpur crime | दुकानात येऊन घातला धुडगूस, नागपुरात तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.