Nagpur Election | नागपूर मनपाच्या निवडणुका केव्हा होणार? मे, जून की, सहा महिने लांबणार

नागपूर महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार यावरून बरीच चर्चा सुरू आहे. काही मेसेज व्हायरल झालेत. त्यानुसार, जून महिन्यात मे, जून मध्ये निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येते. तर सहा महिन्यांनंतर निवडणुका होतील, अशीही माहिती आहे. अद्याप काहीही स्पष्ट नाही.

Nagpur Election | नागपूर मनपाच्या निवडणुका केव्हा होणार? मे, जून की, सहा महिने लांबणार
नागपूर मनपाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:19 PM

नागपूर : बहुसंख्य मतदार हे ओबीसी आहेत. त्यामुळं ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षांचं एकमत झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे अधिकार राज्य संस्थांकडे परत घेण्याचे विधेयक एकमताने विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली. नागपूर मनपा निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश दिल्यास नागपूर मनपा निवडणूक मे महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व सुरू असताना सोशल मीडियावर (Social Media) निवडणुकीचे वेळापत्रक व्हायरल झाले. यामुळं नागपूर मनपा निवडणुकी बाबत संभ्रम वाढला आहे. त्यामुळं ही निवडणूक मेमध्ये होणार, जूनमध्ये की, आणखी सहा महिने थांबावे लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही निवडणूक केव्हा होईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. कारण सध्या नागपूर मनपाची सत्ता ही प्रशासकाच्या हातात आहे. लोकप्रतिनिधींचे काही चालत नाही. नगरसेवक आता माजी झाले आहेत.

मनपा निवडणुकीचा मेसेज व्हायरल

नागपूर, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 15 एप्रिलला लागू होणार आहे. 5 जूनला मतदान तर 10 जूनला मतमोजणी होणार. 10 ते 17 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. भावी नगरसेवकांनो कामाला लागा. अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळं इच्छुकांनी याची खातरजमा करण्यासाठी मनपा प्रशासनाकडं विचारणा केली. हा मेसेज फेक आहे. निवडणूक आयोगाकडून अशी कुठलीही सूचना प्राप्त झाली नाही. असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले. पण, या व्हायरल मेसेजमध्ये काही तत्थ्य नाही, असं मनपा प्रशासनानं स्पष्ट केलं. त्यामुळे उभेच्छुकांची धाकधूक थोडी कमी झाली. कारण हा मेसेज व्हायरल होताच उभेच्छुक अॅक्शन मोडमध्ये आले होते.

वॉर्ड फेररचना होणार का

तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द झाली. दोन सदस्यीय प्रभागानुसार निवडणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 50 टक्के महिला आरक्षणाचा विचार करता दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे. वॉर्ड फेररचना सुरू करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती आहे.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, वाईट काळ लांबच राहील

श्री हरी विठ्ठल ! सावळ्या विठूरायाला चंदनाचा थंडावा, मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न

National Calendar | आता एकच सण दोन दिवस साजरा होणार नाही, केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल, राष्ट्रीय दिनदर्शिका बनणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.