Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?

नागपूर शहरातून वाहणारी नाग नदी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. शहरातील गडर लाईन्स या नदीत टाकल्या जातात. त्यामुळं कितीही वेळा स्वच्छ केली, तरी नदीचे प्रदूषण काही केल्या कमी होत नाही. गेल्या अकरा वर्षांत अनेकदा डीपीआर बदलण्यात आला.

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?
नवी दिल्ली येथील बैठकीत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:43 AM

नागपूर : नागनदी पुनरुज्जीवन (Nagnagi Revival) व संवर्धन प्रकल्पाला 27 ऑक्टोबर 2021 रोजी एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीची मंजुरी मिळाली होती. वित्त विभागाच्या (Finance Department) एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीने नाग नदी पुनरुज्जीवन व संवर्धन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होऊ शकते. नाग नदीवरून नागपूर शहराची ओळख आहे. परंतु, हीच नागनदी शहराच्या प्रदूषणास कारणीभूत ठरते. प्रदूषण दूर करणे हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी स्वीकारले. या नागनदीतून सीप्लेन उडविण्याचे स्वप्न नितीन गडकरी पाहत आहेत. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहेत.

आठ वर्षांचा कालावधी लागणार?

नाग नदीतील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी केंद्र शासनाने नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात विलक्षण भर पडणार आहे. या कामासाठी आठ वर्षाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. या अंतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प तयार केले जाणार आहेत. 500 किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन, कम्युनिटी टॉयलेट निर्माण केले जाणार आहे.

नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट

नवी दिल्लीत पार पडली बैठक

नाग नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. या नदीतून वाहणारे सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ करण्यात येणार आहे. नदीतील सांडपाणी, कचरा, नाग नदीला मिळणार्‍या उपनद्या, नाले यातून होणारे प्रदूषण कमी करण्याचे काम केले जाईल. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तातडीने सल्लागार नियुक्त करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करत कामाला गती द्या, असेही गडकरी यांनी सांगितले. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जायकाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत पार पडलेल्या बैठकीत ना. गडकरी बोलत होते.

मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.