नागपूर : अदानी समुहाला लाखो कोटींचा फटका ज्यामुळे बसला. तो हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट २४ जानेवारीला म्हणजे ७ दिवसांपूर्वी आला. मात्र नागपूरचा एक व्यक्ती असा होता, ज्यानं हेच भाकीत ६ महिन्यापूर्वी वर्तवलं होतं. कोण आहेत अमित विभुते त्यांनी मागच्या दोन वर्षात केलेली किती भाकीतं खरी ठरलीयत. 24 जानेवारीला हिंडेनबर्गचा एक अहवाल येतो. त्यामुळे आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून गौतम अदानी ११ व्या स्थानी फेकले जातात. मात्र हिंडेनबर्गचा तो अहवाल येण्याआधी हेच भाकीत नागपूरच्या अमित विभुते (Amit Vibhute) यांनी करुन ठेवलं होतं. आणि ते सुद्धा हिंडेनबर्गचा रिपोर्ट येण्याच्या ६ महिने आधी. फरक फक्त एवढाय की विभुते यांनी कोणत्याही उद्योग समूहाचं नाव घेतलेलं नव्हतं. सध्या फेसबूकवर वॉर्निंग्स अँड अलर्ट या ग्रृपची चर्चा सुरुय. इथं अमित विभुते यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणारे अनेक जण त्यांनी केलेली अनेक भाकीतं शेअर होतात.
17 ऑगस्ट 2022 ला alfa या गृपवर अमित विभुतेंचं एक भाकीत शेअर केलं गेलं. अगले फेब्रुवारी 2023 से एक बडे व्यावसायिक का अधपतन सुरु होगा. जो अर्थव्यवस्था को हिला देगा. विभुते यांनी दुसरं भाकीत वर्तवलं होतं महाराष्ट्रातल्या सत्ता बदलाचं. शिंदे-भाजप सरकार ३० जून 2022 ला अस्तित्वात आलं. विभुते यांनी 23 फेब्रुवारी 2022 ला एक भाकीत केलं होतं. ते म्हणजे युती रिटर्न लवकरचं आणि हे सुद्धा भाकीत पुढच्या 5 महिन्यांत खरं ठरलं.
महत्वाचं म्हणजे आता राजकारणात पुढे काय होणार, याबद्दलही विभुते यांनी अनेक भाकीतं करुन ठेवलीयत. त्यांच्या मते 2023 आणि 2024 हे वर्ष प्रचंड उलथापालथींचं असेल. युत्या आणि आघाड्यांचे अनेक समीकरणं दिसू शकतील. असे अनेक अंदाज त्यांनी वर्तवले आहेत.
विभुते हे प्रत्येक भाकीताच्या शेवटी हा माझा अंदाज आहे, तो चुकूही शकतो. हे आवर्जून लिहितात. ते कोणत्याही चमत्काराचा दावा करत नाहीत. जग पातळीवरच्या घडामोडी, राष्ट्रीय स्थिती, आर्थिक बदलांचं गणित आणि ग्रहदशा या आधारांवर ते भाकीतं वर्तवतात.
सध्या जितकी चर्चा अदानींच्या साम्राज्याला बसलेल्या हादऱ्यांची होतीय जितक्या चर्चेत हिंडेनबर्गचा रिपोर्ट आहे. तितकीच चर्चा नागपूरच्या अमित विभुते यांच्या भाकितांचीही होऊ लागलीय. नैसर्गिक आपत्ती, सत्ताकारणाबद्दलचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत.