Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत सुधाकर आडबाले ज्यांनी नागो गाणार यांना दुप्पट मतांनी हरविले; जाणून घ्या सुधाकर आडबाले यांचा प्रवास

सुधाकर आडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते आहेत. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले आडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत.

कोण आहेत सुधाकर आडबाले ज्यांनी नागो गाणार यांना दुप्पट मतांनी हरविले; जाणून घ्या सुधाकर आडबाले यांचा प्रवास
सुधाकर आडबाले
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:07 PM

चंद्रपूर : नागपूर शिक्षक मतदार संघाच्या (Nagpur Teachers Constituency) निवडणुकीत सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार नागो गाणार (Nago Ganar) यांना पराभूत केले. सुधाकर आडबाले यांना महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते. आडबाले यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर विभागातील उमेदवार नागो यांच्यापेक्षा सुधाकर आडबाले यांनी दुप्पट मतं घेतली. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी सुधाकर आडबाले यांनी लढा उभारला होता. सुधाकर आडबाले यांना १४ हजार ६१ मतं मिळाली, तर नागो गाणार यांना ६ हजार ३०९ मतं मिळाली.

सुधाकर आडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते आहेत. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले आडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत.

जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन

गेले अनेक वर्ष सुधाकर आडबाले या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते. जुनी पेन्शन योजनेसाठी त्यांनी अनेक आंदोलन केलीत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व सुधाकर आडबाले यांनी केले होते.

आडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा

महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला होता. आडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. त्याचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा याशिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे आडबाले यांच्या विजयात महत्वाचे मुद्दे ठरले.

नागो गाणारांवर आक्रमक नसल्याचा ठपका

नागो गाणार हे गेली दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून आमदार होते. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जातात. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. याचा फटका नागो गाणार यांना बसला.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.