नितीन गडकरी यांना खंडणीची धमकी देणारा कोण?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

फोन कॉल स्ट्रेस करण्यात आले. ज्या व्यक्तीनं फोन केला त्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचा हेतू काय आहे, हे मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

नितीन गडकरी यांना खंडणीची धमकी देणारा कोण?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 6:25 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळं गडकरी यांच्या घराची आणि कार्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाईन नंबरवर धमकीचे फोन कॉल आले. १०० कोटी रुपयांची खंडणी काल मागण्यात आली. १४ जानेवारीला सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील (Nagpur) कार्यालयात धमकीचे फोन आल्यानं पोलीस अलर्ट झाले.

धमकी देणाऱ्यावर खुनाचा गुन्हा

यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, फोन कॉल स्ट्रेस करण्यात आले. ज्या व्यक्तीनं फोन केला त्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचा हेतू काय आहे, हे मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आरोपीचा हेतू काय?

यासंदर्भात चौकशी सुरू आहे. आरोपीचा हेतू काय आहे. त्याच्यामागे आणखी कुणी आहे का, याची पडताळणी पोलीस विभाग करीत आहे. प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात येत आहे की, संबंधित आरोपीनेच फोन कॉल्स केले आहेत.

बेळगावमधून आला धमकीचा फोन

कर्नाटकच्या बेळगाव येथून हा फोन आलेला आहे. नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांची मदत घेतली. बेळगावच्या आयुक्तांशी बोलून फोन स्ट्रेस करण्यात आला. त्यानंतर असं लक्षात आलं की, एक व्यक्ती बेळगाव येथील जेलमध्ये आहे. त्याने धमकीचा फोन केला आहे.

आरोपीपर्यंत फोन कसा पोहचला. त्यासाठी कुणाची मदत घेतली. याची माहिती घेतली जात आहे. कर्नाटक पोलीस नागपूर पोलिसांना मदत करत आहे. नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामागचा उद्देश काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हा आहे तो गँगस्टर

जयेश कांता असं या गँगस्टरचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, तुरुंगातून ही धमकी देण्यात आली आहे. अवैधरीत्या फोनचा वाप करून त्याने धमकी दिल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. बेळगाव जेल प्रशासनाने कांताकडून एक डायरी जप्त केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.