Devendra Fadnavis | भाजपकडून राज्यसभेत कोण जाणार?, डॉ. विकास महात्मे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
अजय संचेती हेसुद्धा भाजपकडून उभेच्छुक आहेत. तसेच विकास महात्मे यांनीसुद्धा राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुन्हा संधी दिली तर राज्यसभेवर जायला आवडेल, असं त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
नागपूर : भाजपचे माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. भाजपने संधी दिल्यास पुन्हा राज्यसभेत जाण्याची डॉ. महात्मे यांनी फडणवीसांकडे इच्छा व्यक्त केली. राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणून डॉ. विकास महात्मे (Dr. Vikas Mahatme) यांचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. विकास महात्मे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेत कोण जाणार? याचा सस्पेन्स (Suspense) कायम आहे. भाजप राज्यसभेत कुणाला पाठविणार, याबाबत अद्याप सांगण्यात आलं नाही. विकास महात्मे यांच्याशिवाय अजय संचेती यांचंही नाव उमेदवारीसाठी घेतल जातंय.
विकास महात्मे धनगर समाजाचे नेते
विकास महात्मे हे धनगर समाजाचे नेते आहेत. धनगर समाजाचे संघटन त्यांनी तयार केले. त्यामुळं मागच्या वेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपनं दिली होती. काँग्रेस तसेच भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अजय संचेती हेसुद्धा भाजपकडून उभेच्छुक आहेत. तसेच विकास महात्मे यांनीसुद्धा राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुन्हा संधी दिली तर राज्यसभेवर जायला आवडेल, असं त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
काँग्रेसमध्येही राजकीय हालचालींना वेग
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. राज्यसभेतील राज्यातील सहा जागांपैकी काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, उत्तमसिंह पवार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. प्रदेश काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत स्थानिक नेत्यांनी संधी द्यावी, यावर भर देण्यात आलाय. ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रशिक्षण शिबिर येत्या रविवारी होणार आहे. यानिमित्त नागपुरात दिग्गज नेते येणार आहेत.