Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Maharajbag | कुणी दत्तक घेता का दत्तक, नागपूरच्या महाराजबागेतील वन्यजीव पालकत्वाच्या प्रतीक्षेत

वन्यजीव प्रेमींच्या थंड प्रतिसादामुळे वन्यप्राणी दत्तक योजना मागे पडताना दिसत आहे. कोरोनानंतर वन्यजीव प्रेमी महाराजबागेतील प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी पुढे सरसावलेले नाहीत. त्यामुळे या अभिनव योजनेवरचं प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र महाराजबाग प्रशासन वन्यजीव प्रेमींना पुढे येण्याच आवाहन करत आहे.

Nagpur Maharajbag | कुणी दत्तक घेता का दत्तक, नागपूरच्या महाराजबागेतील वन्यजीव पालकत्वाच्या प्रतीक्षेत
नागपूरच्या महाराजबागेतील वन्यजीव पालकत्वाच्या प्रतीक्षेत Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:58 AM

नागपूर : 2014 साली वन्यप्राणी दत्तक योजना (Wildlife Adoption Scheme) उत्साहात सुरू करण्यात आली. सुरुवातीला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी वन्यजीवांना दत्तक घेतलं. मात्र कोरोनाच्या काळात अनेकांना या योजनेचा विसर पडला आहे. आता कोरोनाचा काळ संपला असला तरी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे महाराजबागमध्ये असलेले अनेक प्राणी कुणी आमचे पालकत्व (Guardianship) स्वीकारेल, का या प्रतीक्षेत आहेत. वन्यप्राण्यांच्या प्रती प्रेम निर्माण व्हावे आणि ते प्रेम व्यक्त करता यावे यासाठी काही वर्षांपूर्वी नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडून वन्यप्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून वन्यजीवांचे संरक्षण (Wildlife Conservation) आणि संवर्धन व्हावे हा उद्देश आहे.

फक्त पाच प्राणी दत्तक

योजना सुरू झाल्याच्या अगदी सुरुवातीलाच प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफ याने ली नामक वाघिणीला दत्तक घेतले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी वन्यप्राणी दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हळूहळू लोकांचा प्रतिसाद कमी झाला आहे. कोवीडनंतर आतापर्यंत केवळ 5 लोकांनी वन्यप्राणी दत्तक घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.

पालकत्व स्वीकारणार कोण

वन्यजीव प्रेमींच्या थंड प्रतिसादामुळे वन्यप्राणी दत्तक योजना मागे पडताना दिसत आहे. कोरोनानंतर वन्यजीव प्रेमी महाराजबागेतील प्राण्याला दत्तक घेण्यासाठी पुढे सरसावलेले नाहीत. त्यामुळे या अभिनव योजनेवरचं प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र महाराजबाग प्रशासन वन्यजीव प्रेमींना पुढे येण्याच आवाहन करत आहे. वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला वन्यजीवांबद्दल आकर्षण असते. मात्र त्यांची जबाबदारी घेण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढे येण्याची गरज आहे. कोरोना काळ संपला आता तरी वन्यप्रेमींनी पुढे येत या प्राण्यांचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. त्यांना आपलं केलं पाहिजे.

हे सुद्धा वाचा

प्राणी दत्तक घेण्यासाठी किती खर्च

  • वाघाला वर्षभरासाठी दत्तक घ्यायचे असेल तर एक लाख रुपये
  • बिबट्याला दत्तक घेण्यासाठी वर्षाकाठी 50 हजार रुपये
  • मगर 15 हजार
  • बंदरसाठी (वानर) 20 हजार रुपय
  • अस्वलसाठी 50 हजार
  • नीलगाय 10 हजार
  • सांबर 10 हजार
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.