NMC Election | तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादी अडचणीत; नागपुरात प्रफुल्ल पटेलांना का व्हावे लागले सक्रिय?

राष्ट्रवादी खंबीर नेतृत्वाअभावी शहरात फारसा टिकाव धरू शकला नाही. आता प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांत प्राण फुंकले आहे. दुनेश्वर पेठे हे स्वतः नगरसेवक आहेत. ते काय जादू करतात, हे पाहावे लागेल.

NMC Election | तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादी अडचणीत; नागपुरात प्रफुल्ल पटेलांना का व्हावे लागले सक्रिय?
नागपूर मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे प्रफुल्ल पटेल.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 6:04 AM

नागपूर : मनपा निवडणुकीत (NMC Election) स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं. त्यामुळं राष्ट्रवादीला मनपात एकटे लढण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन निवडणुकींचा विचार करता राष्ट्रवादीचा परफार्मन्स प्रत्येक वेळ खाली घसरला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील माजी मंत्री अनिल देशमुख आता जेलमध्ये आहेत. त्यामुळं त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात सभा घेऊन अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काँग्रेस जवळ घेत नसेल, तर स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे. पण, तीन सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने घड्याळाचा आलाराम किती वाजणार हे येणारी वेळच ठरवेल.

गेल्या तीन निवडणुकीत राष्ट्रवादीचा ग्राफ घसरतोय

राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात नेते मिळाले. पण, कार्यकर्ते फारसे मिळाले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत राष्ट्रवादीने दोन अंकी आकडा पार केला नाही. २००७ मध्ये नऊ जागा, २०१२ मध्ये सहा जागा, तर २०१७ मध्ये फक्त एका जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. २०१७ मध्ये मनपा निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. सुमारे ५० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग होता. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने छोटे पक्ष फारसे टिकले नाहीत. राष्ट्रवादीने ११० जागांवर निवडणूक लढविली होती. सोबतीला प्रा. जोगेंद्र कवाडे, पीरिपा होते. पण, फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. दुनेश्वर पेठे राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार निवडूण आले होते.

नेतृत्त्वानेच सोडली राष्ट्रवादीची साथ

ज्या नेत्यांवर राष्ट्रवादीची धुरा देण्यात आली त्यांनी पक्षाची साथ सोडल्याचे दिसून येते. गिरीश गांधी यांना राष्ट्रवादीचे शहराचे नेतृत्तव दिले होते. त्यांनी पक्षाचे कार्यायल उभारले. नंतर स्वतःला पक्षापासून दूर केले. माजी आमदार अशोक धवड यांनाही नेतृत्तव सोपविण्यात आले होते. पण, त्यांनी घड्याळाची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला. त्यानंतर अजय पाटील आले. पण, त्यांची पत्नी प्रगती पाटील या अध्यक्ष भाजपकडून महापालिकेची निवडणूक लढल्या. त्यामुळं राष्ट्रवादी खंबीर नेतृत्वाअभावी शहरात फारसा टिकाव धरू शकला नाही. आता प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांत प्राण फुंकले आहे. दुनेश्वर पेठे हे स्वतः नगरसेवक आहेत. ते काय जादू करतात, हे पाहावे लागेल.

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.