Nagpur Crime | नागपुरात पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या; रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले
कोणत्याही कामात त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांच्या मनात बरेचदा आत्महत्येचा विचार यायचा. शेवटी त्यांनी रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यात ज्या जाळल्या गेल्या.
नागपूर : कळमेश्वर तालुक्यात सावंगी तोमर (Sawangi Tomar) गाव आहे. याठिकाणी शोभाबाई आणि गोपालराव भोतमांगे यांचे कुटुंब राहत होते. त्यांना चौतीस वर्षांचा एक मुलगाही आहे. दरम्यान, काही दिवासंपूर्वी गोपालराव यांचा मृत्यू झाला. यामुळं शोभाबाई चिंतेत होत्या. वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झालं. तेव्हापासून ती पतीच्या सोबत होती. संसारात बरेच सुखदुःख बघीतले. पण, गोपालराव गेल्यामुळं शोभाबाईचं (Shobhabai) मन काही कुठे रमेना. त्यांनी बराच प्रयत्न केला. पण, त्यांना वारंवार पतीची आठवण येत होती. त्यामुळं त्या नेहमी चिंताग्रस्त (Anxious) राहत होत्या. कोणत्याही कामात त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांच्या मनात बरेचदा आत्महत्येचा विचार यायचा. शेवटी त्यांनी रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यात ज्या जाळल्या गेल्या.
जळाल्याने झाला मृत्यू
शोभाबाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, जळालेल्या असल्यामुळं त्यांना डॉक्टरही वाचवू शकले नाही. त्यांचा मुलगा राहुल याने याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांनी गुन्हा दाखला केलाय. तपास पोलिस निरीक्षक मुंडे करीत आहेत. आजूबाजूच्या लोकांचे बयाण घेतल्यानंतर शोभाबाई यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितलं. एकंदरित, पतीचा विरह सहन न झाल्यानं शोभाबाईनं हे आत्मघाती पाऊल उचलल्याचं समजतं.
जनावरे काढायला पाण्यात उतरला तो परतलाच नाही
कुही तालुक्यातील शिवणी येथे शेतातून गाई घरी आणत असताना जयराम हारगुडे यांच्या गाई नदीच्या पाण्यात गेल्या. त्यामुळे त्यांना पाण्याबाहेर काढण्यासाठी जयराम हे पाण्यात उतरले. सध्या आमनदीत गोसेखुर्द धरणातील बँक वॉटरमुळे नदीपात्र तुडुंब भरलेले आहे. पाणी जास्त असल्याने त्याचा पाय घसरला असावा. त्यामुळे ते घरी परतले नाही. इकडे सोमवारपासून सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. शेवटी मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास केशोरी येथील महिला मजुरांना तो पाण्यात तरंगताना दिसला. तेव्हा शिवणीतील काही युवकांनी नावेने पाण्यात जाऊन शोधले. तो जयराम हारगुडे आहे हे निष्पन्न झाले. वेलतूर पोलीस ठाण्याचे सपोनी नितेश डोर्लीकर हे घटनास्थळी दाखल झाले. गावकर्यांच्या मदतीने मृतकाचे पार्थिव नदीतून बाहेर काढण्यात आला.