ऊस बिलातून वीज बिलाची वसुली खपवून घेणार नाही; स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांचा इशारा
शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे वीज बिल वसुल करणे हे चुकीचं आहे. जो ऊस शेतकरी कारखान्यांना देतात त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. पण, परस्पर विज बिल वसुली करणे हे अत्यंत चुकीचं आहे.
बुलढाणा : पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू आहे. ही वीजबिल वसुली (Electricity bill recovery) अशाप्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. अशाप्रकारे ऊस बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) रस्त्यावर उतरून आंदोलन करणाराय. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिलाय. तर उर्जामंत्र्यांनाही तुपकर यांनी सुनावले. अशाप्रकारे वीज बिल वसुली न करता यासाठी वेगळी यंत्रणा आहे आणि ऊसाचे बिल हे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत. त्यामुळे ही वसुली थांबवा अन्यथा आक्रमक आंदोलन करणार असल्याचंही रविकांत तुपकर म्हणाले.
वीज बिल वसुलीसाठी असा कायदा नाही
शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे वीज बिल वसुल करणे हे चुकीचं आहे. जो ऊस शेतकरी कारखान्यांना देतात त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. पण, परस्पर विज बिल वसुली करणे हे अत्यंत चुकीचं आहे. असा कुठल्याही पद्धतीचा कायदा नाही. त्यामुळं यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना साखर कारखान्यांसमोर आंदोलन करेल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिलाय.
शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या
रविकांत तुपकर म्हणाले, वाईन विकण्याचे परवाने ज्यांनी दिले त्यांना विचारा, नेमकं सरकारचं काय चाललं ते. वाईन आणि दारू हा वेगळा विषय आहे. वाईनचा विषय थेट संबंध शेतकर्यांशी येतो. तर मी किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन करणार नाही. परंतु शेतकरी टिकला पाहिजे. हीसुद्धा त्या पाठीमागची आमची भूमिका आहे. सरकारने मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे छोटे मोठे निर्णय घेऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही स्वभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय.