Nagpur NCP | नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार?, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंनी घेतली नाना पटोलेंची भेट

राज्यात यापूर्वी भाजपची सत्ता होती. ही सर्व परिस्थिती असताना नागपूर शहराचा विकास झाला नाही. यासाठी भाजपची सत्ता उलथवून पाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक असल्याचं दुनेश्वर पेठे म्हणाले.

Nagpur NCP | नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार?, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंनी घेतली नाना पटोलेंची भेट
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंनी घेतली नाना पटोलेंची भेट Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 12:56 PM

नागपूर : भंडारा – गोंदियातील वादानंतर आता नागपुरात राष्ट्रवादीचे काँग्रेससोबत आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (Duneshwar Pethe) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेतली. नागपूर मनपा निवडणुकीत आघाडी करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढावे ही पक्षश्रेष्ठींची भूमिका असल्याचं दुनेश्वर पेठे यांनी सांगितलं. भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये काही तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी थेट राष्ट्रवादीच्या हायकमांडकडं तक्रार केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नागपूर महापालिका निवडणुकीत (Election) एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. काल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. दुनेश्वर पेठे यांनी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.

वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळे प्रश्न

गेल्या पंधरा वर्षात भाजपची नागपूर मनपात सत्ता आहे. जनतेची कामं झालेली नाहीत. जनतेला या त्रासातून मुक्त करण्यासाठी सत्ताबदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र यावं, अशी इच्छा आहे. नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या हायकमांडकडं तक्रार केली. त्यावर दुनेश्वर पेठे म्हणाले, वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न असतात. नागपूर मनपात आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहराचा हवा तसा विकास नाही

नागपूर मनपाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शहरात हवा तसा विकास झाला नाही. काही भागामध्ये लोकांना पाणी मिळत नाही. आम्ही आघाडीचा प्रयत्न करू. वरिष्ठ जागावाटपाचं काय ते ठरवतील, असंही दुनेश्वर पेठे यांनी स्पष्ट केलं. गेल्या पंधरा वर्षात नागपूर मनपात भाजपची सत्ता आहे. केंद्रातही भाजपची सत्ता आहे. राज्यात यापूर्वी भाजपची सत्ता होती. ही सर्व परिस्थिती असताना नागपूर शहराचा विकास झाला नाही. यासाठी भाजपचीसत्ता उलथवून पाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक असल्याचं दुनेश्वर पेठे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.