Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 पैकी काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला असला तर सत्तेसाठी त्यांना कुणाचीतरी साथ हवी आहे. बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी आणखी पाच सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. त्यासाठी ते कुणाला जवळ करतात, हे पाहावे लागेल.

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?
भंडाऱ्यातील विजयी उमेदवार जल्लोष करताना
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:04 AM

भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींचे निकाल बुधवारी, 19 जानेवारी रोजी दोन टप्प्यांत जाहीर झाले. 52 जिल्हा परिषदेच्या जागांवर काँग्रेस 21, भाजप 12, राष्ट्रवादी काँग्रेस 13, शिवसेना एक, वंचित बहुजन आघाडी एक, बहुजन समाज पक्ष एक आणि अपक्ष दोन विजयी झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला जिल्ह्यात मोठ्या मुश्किलीने खाते उघडण्यात यश आले आहे. 2015 मध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाच्या 19 जागा होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 15 तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी अपक्षांच्या पाच आणि शिवसेनेची एक अशा पाच जागा होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या दोन जादा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.

भाजपने झेडपीत ना गमावले ना कमावले

2015 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. सध्या, यावेळी आमदार परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 2015 सारख्याच म्हणजे 13 जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी तीन जागा गमावल्या आहेत. 2015 मध्ये पाच अपक्ष जागा होत्या. यावेळी ते दोनवर आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळपर्यंत शिवसेनेचे खातेही उघडले नव्हते. सायंकाळी सहा वाजता पवनी तहसीलच्या सावर्ला राजश्री तिघरे यांनी विजयी झालेल्या शिवसेनेला दिलासा दिला.

या दिग्गजांचा भंडाऱ्यात पराभव

नाना पटोले यांचे समर्थक माजी अध्यक्ष रमेश डोंगरे (काँग्रेस), नाना पटोले यांच्या जवळचा माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, माजी समाजकल्याण सभापती रेखा वासनिक यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे अरविंद भालाधरे विधानसभेनंतर दुसऱ्यांदा पराभूत झाले. भाजपच्या नेपाल रंगारी यांचाही पराभव झाला. गणेशपूर मतदारसंघातून भाजपचे सूर्यकांत इलमे यांना हार स्वीकारावी लागली. भाजपचे नितीन कडव यांच्या पत्नी लता कडव याही निवडणूक जिंकू शकल्या नाही. राष्ट्रवादीचे रुपेश खवास तसेच शिवसेनेचे अनिल गायधने गणेशपूरमधून पराभूत झालेत.

Chandrapur Election | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची सरशी; तीन नगरपंचायतीमध्ये बहुमत; पण, व्हाईट हाऊस भाजपचेच

Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.