Nagpur Temperature | एप्रिल आलाय उन्हाचे चटके आणखी वाढणार; विदर्भातील तापमान 45 पर्यंत जाणार

भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) नोंदीनुसार, एप्रिलमध्ये तापमान वाढते. 40-42 डिग्री सेल्सिअसवरून ते 45-46 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचते. रात्रीचे तापमान 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तर दिवसा याच तापमानात वाढ होते. एप्रिलपाठोपाठ मे महिनाही तापमान वाढणार आहे.

Nagpur Temperature | एप्रिल आलाय उन्हाचे चटके आणखी वाढणार; विदर्भातील तापमान 45 पर्यंत जाणार
एप्रिलमध्ये तापमान वाढणार असल्यानं उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:29 AM

नागपूर : मार्च संपला. एप्रिलला सुरुवात झाली. आता उन्हाचे चटके विदर्भात आणखी (Summer clicks in Vidarbha) वाढणार आहेत. एप्रिल महिन्यात तापमान 44-45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. मार्चमध्ये सूर्य डोक्यावर असतो. त्यानंतर सूर्य मध्य प्रदेश, राजस्थानकडं सरकत जातो. एप्रिल महिन्यातील तापमान यापूर्वी 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले आहे. 2009 मध्ये 30 एप्रिलमध्ये नागपूरचे तापमान 47.1 डिग्री सेल्सिअस होते. 2019 मध्ये अकोल्याचे तापमान 47.2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. भौगोलिक परिस्थितीनुसार (Geographical conditions) विदर्भ हा संवेदनशील भाग आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) नोंदीनुसार, एप्रिलमध्ये तापमान वाढते. 40-42 डिग्री सेल्सिअसवरून ते 45-46 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचते. रात्रीचे तापमान 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तर दिवसा याच तापमानात वाढ होते. एप्रिलपाठोपाठ मे महिनाही तापमान वाढणार आहे.

तापमानात घसरण झाल्याच्याही नोंदी

एप्रिलमध्ये जसे चटके बसतात, तसे तापमान खाली आल्याच्याही नोंदी आहेत. 1937 मध्ये विदर्भात पाऊस पडला होता. 1 एप्रिल 1968 मध्ये नागपूरचे तापमान 13.9 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. अकोल्यामध्ये एक एप्रिललाच 1905 मध्ये तापमान 11.1 अंशांपर्यंत खाली आले होते. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास एप्रिलमध्ये नागपूरचे तापमान 43 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर अकोल्याचे तापमान 43 ते 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. त्यामुळं यंदाही तापमान 42 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

कसे राहणार पुढील आठवड्याचे तापमान

नागपुरात पुढील आठवड्यात 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं नोंदविला आहे. पुढील आठवड्यात चंद्रपुरात 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत जास्तीतजास्त तापमान राहील. अकोल्यातही येत्या आठवड्यात जास्तीत-जास्त तापमान 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर अमरावतीमध्ये 40 ते 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत जास्तीत-जास्त तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

चंद्रपुरातील पवनपार, मरेगाव, गुंजेवाहीतील सापडलेल्या वस्तू सारख्याच; जिल्हा प्रशासनाने ISRO दिले पत्र

Raosaheb Danve on Raj Thackeray: राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा, गडकरींची भेट, मनसे-भाजप युती होणार का?; रावसाहेब दानवेंकडून पहिलंच मोठं विधान

Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.