मतं घेतांना याची लाज वाटिले पाहिजे, आमदार बच्चू कडू असं का म्हणालेत
आपली जेवढी बॉथरूम आहे. तेवढी त्यांची घरं आहेत. आत मी पाल टाकून बसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
नागपूर : घरकुल आवास योजनेवरून बच्चू कडू विधानसभेत आक्रमक झाले. बच्चू कडू म्हणाले, गावात घर बांधायचे तर २१ अटी आहेत. शहरात फक्त उत्पन्नाचे दाखला द्यायचा आहे. शरम वाटते गावात फिरताना. घरासाठी जात पहिली जात आहे. माझ्या मतदार संघात ५४० घरे पडली. आपलं जेवढं बाथरूम आहे ना तेवढं त्यांच घर पण नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात आख्ख्ये घर पडले आहेत. बाबासाहेबांनी घटना लिहितांना हे पहिले की, सरकारकडून अन्न भेटले पाहिजे. घर दिलं पाहिजे. गिरीश भाऊ आपण यात लक्ष घातले पाहिजे. तुम्ही इतके दिवस राजकीय तारणहार होता. आमचे तारणहार व्हा. आपण मतं घेतांना याची लाज वाटिले पाहिजे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
ओबीसीमधील ५६० लोकांचे घर पडलेत. ते घरं मातीचे होते. भटक्या जमातीतील लोकं पालीत राहतात. आपली जेवढी बॉथरूम आहे. तेवढी त्यांची घरं आहेत. आत मी पाल टाकून बसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
शहरी आणि ग्रामीण भागातील तफावत चालणार नाही. मेळघाटात अख्या आदिवासींचे घरं पडलेले आहेत. हेलिकॉप्टरनं दौरा केला, तर कौलाशिवाय घर सापडणार नाही तिथं. अन्न, वस्त्र, निवारा हे घटनेचं पसायदान आहे. ७० वर्षे स्वातंत्र्याला उलटून गेले. या तीन गोष्टी पूर्ण करू शकत नाही आपण. तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही तारणहार आहेत. असं गिरीश महाजन यांना म्हणाले.
२७ पासून मी पालघरातचं राहायला जाणार आहे. माझं म्हणण आहे सर्व बजेच मागं ठेवा. किमान राज्यात घरांची तर व्यवस्था झाली पाहिजे. ग्रामीण भागात शिकस्त असणारे भरपूर घरं आहेत. मातीच्या घराचं बजेट मोठं करावं. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून ठोस निर्णय घेतला पाहिजे. केंद्राला आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. केंद्राचे २१ निकष आहेत. त्यावर तातडीनं बैठक घेऊन लगेच निर्णय घ्यावा, असंही बच्चू कडू यांनी विधानसभेत सांगितलं.