युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?

तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली होती. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केलीय. त्यामुळे गटबाजी उफाळून आलीय.

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?
नागपूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तौसिफ खान, बाजूला त्यांचे वय 39 वर्षे असल्याचे दिसते. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:44 AM

नागपूर : युवक काँग्रेसच्या निवडणुकीत (Youth Congress Election) नागपुरातील तौसिफ खान यांची शहरअध्यक्ष (Tousif Khan City President) म्हणून निवड करण्यात आलीय. पण 39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? असा सवाल शहराध्यक्ष पदाची निवडणूक लढलेले वसीम खान आणि सहकारी अक्षय घाटोळे यांनी विचारला. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. याबाबत दिल्ली दरबारी तक्रार करणार आहोत. वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वाधिक मत घेणारा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर मत घेणाऱ्यांना उपाध्यक्ष, महासचिवचे पद मिळते. तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली होती. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके (National Secretary Bunty Shelke) यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केलीय. त्यामुळे गटबाजी उफाळून आलीय.

वय 35 वर्षांपेक्षा जास्त

वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत. युवक काँग्रेसने वसीम खान, रौनक चौधरी व अक्षय घाटोळे हे तीन महिन्यांपर्यंत आपला कार्यभार सांभाळू शकणार नाही.

कुणाला मिळाली किती मते

उमेदवार मिळालेली – मते तौसिफ खान – 25,935 वसीम खान – 12,८३836 अक्षय घाटोळे – 9,098 तेजस जिचकार – 5809 सुभम सांगोळे – 2,723

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ

Nagpur Crime | तुरुंगातच प्रकृती बिघडली, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांचा एकामागून एक मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.