नागपुरात सभांचा धडाका, ग्रामीण भागातही रंग चढला, ZP, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला
नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. ग्रामीण भागात तर राजकीय आखाडा रंगायला सुरवात झाली आहे. भाजप, काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आता मैदानात उतरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. ग्रामीण भागात तर राजकीय आखाडा रंगायला सुरवात झाली आहे. भाजप, काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आता मैदानात उतरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. गावागावात छोट्या प्रचार सभा रंगत आहेत.
सुनिल केदार-चंद्रशेखर बावनकुळे आमनेसमाने
नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या प्रचारात मंत्री सुनील केदार मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बाजू सांभाळताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा कारभार तसेच स्थानिक मुद्द्यांवरुन भाजप काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक येत्या 5 ऑक्टोबरला होणार असल्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराला गती दिलीय.
जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 79, तर पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असल्यामुळे वेळ कमी असल्याचा अंदाज सर्वच पक्षांना आलाय. कदाचित याच कारणामुळे नेतेमंडळी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतील 16 गटासाठी व 31 गणांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
1115 मतदान केंद्रावर होणार मतदान
या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार व 3 लक्ष 19 हजार 292 पुरुष मतदार असे एकूण 6 लक्ष 16 हजार 016 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 1115 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात ग्रामीण भागात 863 व शहरालगतच्या 252 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. एकीकडे प्रशासन निवडणूक पार पाडण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. तर दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याकडे मतदार कसा खेचला जाईल यासाठी जमेल तो प्रयत्न करताना दिसत आहेत.
असे असले तरी या निवडणुकीत कोणाची सरशी होणार आणि कोणाला अपयशाला समोरे जावे लागणार हे येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मदतान झाल्यानंतरच समजेल. सध्या तरी प्रचाराला रंग चढलाय हे मात्र नक्की.
इतर बातम्या :
फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं
आता सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये; यशोमती ठाकूर यांचा बोचरा वार
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम’ योजना, धनंजय मुंडेंची
Video : Vinayak Raut | 30 ऑक्टोबरपर्यंत विमानाचे बुकिंग हाऊसफुल, विनायक राऊत यांची माहिती
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv#VinayakRaut @Vinayakrauts pic.twitter.com/1EYq077Xxo
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021