Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 20 नोव्हेबर रोजी मतदान होत आहे. या मतदान एकाच टप्प्यात होत असून तुम्हाला मतदान करायला जाण्यापूर्वी तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे घरबसल्या चेक करता येणार आहे.

Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 6:02 PM

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तुम्ही व्होट करायला जाण्याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? तुमचे नाव मतदार यादीतून कापले गेले तर नाही ना ? याची मतदानापूर्वी खातरजमा करता येते. अनेकदा मतदारांकडे मतदान ओळखपत्र असते. परंतू मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांचा हिरमोड होतो. त्यामुळे निराशा टाळण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचण्याआधीच तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे कसे चेक करायचं ते आपण आता येथे पाहूयात…..

सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर  https://www.eci.gov.in वर लॉग इन करावे लागेल. जसे तुम्ही ही वेबसाईट उघडल्यानंतर होम पेजवर पोहचाल. त्यानंतर डाव्या बाजूला थोडे खाली गेल्यानंतर Search Your Name in Voter List हा पर्याय दिसू लागेल. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आणखी एक पेज तुमच्यासमोर संगणकावर उघडेल. ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर राज्याची निवड केल्यानंतर एक आणखी पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तेथे आपला EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल. कॅप्चा भरल्यानंतर तुमचे नाव जर मतदार यादीत दिसेल त्यावर तूमची संपूर्ण माहिती देखील दिसेल. तुम्ही या पेजचे प्रिंटआऊट देखील काढू शकता. ज्यात तुमच्या पोलिंग बूथची आणि अन्य माहिती दिलेली असेल.

मोबाईल क्रमांकाने ही चेक करु शकता…

जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मतदार यादीत नोंदविला असेल तर मोबाईल नंबर नोंदवून देखील तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत चेक करु शकता. येथे माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्च कोड नोंदवावा लागेल. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

SMS आणि टोल-फ्री नंबरवरुन तपासू शकता.

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? हे आपण SMS द्वारे देखील चेक करु शकता. यासाठी आपल्याला ‘ECI <space> Voter ID’ आणि आपला EPIC नंबर टाकावा लागणार आहे. ही सेवा टोल फ्री आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या नावाची मतदार यादीतील स्थिती सांगितली जाईल.तुम्ही 1950 नंबर वर कॉल करुन देखील ही माहिती मिळवू शकता. ही सेवा मोफत आहे. या टोल फ्री नंबर वरुन तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची पडताळणी करु शकता.