दुसऱ्याच्या घरात आग लावायला गेले आता विदर्भात लागली त्याचं काय? नाना पटोले यांचा रोख कुणावर ? काय म्हणाले नाना पटोले…
सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय भाजपला घरं फोडण्यात आनंद असल्याचे नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.
मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Nana Patole ) यांनी नाशिकमध्ये पन्नास आमदार आणि पाच खासदार निवडून आणणार असल्याचे सांगत रणनीती ठरल्याचा इशारा भाजपला ( BJP ) दिला आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांचे नाव न घेता भाजपला दुसऱ्याची घरं फोडून आनंद व्यक्त करण्याची सवय झाली आहे. पण आता विदर्भात आग लागली आहे असं म्हणत टोला लगावला आहे. सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, त्याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकाल लागण्याच्या आधीच विजय सत्यजित तांबे यांचाच होईल असेही म्हंटले होते असा संदर्भ देत हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर बोलणं टाळत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये भाजपची पहिल्यापासून भूमिका घरं फोडण्याची असल्याचं म्हंटलं आहे.
कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी उमेदवारी मागितली नव्हती, तरीही असं काय घडलं की सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर भाजपने पाठिंबा दिला आहे. तर सत्यजित तांबे यांना सुरुवातीपासूनच भूमिका जाहीर करा म्हणून आव्हान देत होतो पण त्यांनी केलं नाही.
4 फेब्रुवारीला सत्यजित तांबे भूमिका जाहीर करणार असल्याच्या मुद्द्यावरही नाना पटोले यांनी बोलणं टाळत त्यांची भूमिका जाहीर झाल्यावर बोलू असे म्हंटलं आहे.
तर हायकमांडने सत्यजित तांबे यांच्याबाबत निर्णय घेतल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही म्हणत सत्यजित तांबे यांचे निलंबन मागे घेण्यावरही भाष्य केलं नाही.
तर नाशिकमध्ये पुढील काळात निवडणूक लढण्यासाठी नाना पटोले यांनी रणनीती ठरली असून पन्नास आमदार आणि पाच खासदार निवडून आणण्याचा दावा केला आहे. पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा इशारा दिला आहे.
त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यासह सुधीर तांबे यांची भूमिका जाहीर झाल्यावर नाना पटोले यांची भूमिका महत्वाची असणार आहे, तर राज्यात भाजपला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याने पटोले यांनी भाजपला चिमटे काढले आहे.