मुंबई : आज विधानसभेत शेकडो आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Dedendra Fadnaivis) विधानसभा हलवून सोडली. फडणवीसांनी आरोपच एवढे गंभीर केले की अनेकांच्या मनात संशयकल्लोळ सुरू झाला असेल. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेते भाजपमधील नेत्यांना संपवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत पडणवीसांनी भलं मोठं स्टिंग ऑपरेशनच सादर केलं. एवढेच नाही, तर पुराव्यांचा पेनड्राईव्हही सादर केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. मात्र या आरोपांना नाना पटोलेंनी (Nana Patole) तेवढेच खोचक उत्तर दिले आहे. जे काही व्हिडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे.
भाजपने फोन टॅपिंगचे उत्तर द्यावे
तसेच भाजपवर प्रत्यारोप करताना, त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपिग केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणविस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. फडणवीसांच्या आरोपांना उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील, या व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओची डबिंग झालेली असू शकते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
अधिकाऱ्यांचा आरोपांवर बोलण्यास नकार
तसेच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, घरचे सिसीटीव्ही फुटेज कसे बाहेर आले? हे देखील तपासले पाहिजे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या विधानाबाबत विचारले असता, जर दाऊदसोबत व्यव्हार झाला असेल तर नवाब मलिकांचा राजिनामा घेतलाच पाहिजे, याबाबत दुमत नाही, असे पुनरोच्चार त्यांनी केला आहे. विघातक शक्तींसोबत जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र, इकबाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई केली का जाऊ नये? असा सवालही त्यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेल्या महिला पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण यांचा या प्रकरणात बोलण्यास नकार दिला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. मी आताचं काही स्पष्टीकरण देणार नाही. वरीष्ठ अधिकारी डीसीपी याॉसंदर्भात स्पष्टीकरण देतील, असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? सरकारमधल्या नेत्याचा सरकारला सवाल
फडणवीसांनी विधानसभेत मांडला महाविकास आघाडीचा “महाकत्तलखाना”, सरकारवर आरोपांची सरबत्ती