Nana Patole | ‘नेत्यांचे फोन टॅप करण्याचा Gujarat pattern समोर आणणार’
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. येत्या सोमवारी 500 कोटींचा दावा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर ठोकणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलीय. नाना पटोले यांचं अमजद खान या नावानं फोन टॅपिंग करण्यात आलं होतं. येत्या सोमवारी 500 कोटींचा दावा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर ठोकणार आहे, असं नाना पटोले म्हणाले. येणाऱ्या काळात कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये, असं ते म्हणाले. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असून सूत्रधारांचा पर्दाफाश मविआ केल्याशिवाय राहणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फोन टॅपिंग करण्यात आलं. आता रश्मी शुक्ला, डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
Latest Videos