राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? सरकारमधल्या नेत्याचा सरकारला सवाल

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) पुन्हा सरकारला काही सवाल केले आहेत. काल शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला होता तर आज त्यांनी राज्यातल्या नोकर भरतीचा (Unemployment) मुद्दा उपस्थित केला आहे.

राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? सरकारमधल्या नेत्याचा सरकारला सवाल
नाना पटोलेंकडून नोकरभरतीचा सवाल उपस्थितImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 7:40 PM

मुंबई : राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Assembly Session) सुरू असल्याने अनेक महत्वाचे प्रश्न सध्या या अधिवेशात मांडण्यात येत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्याकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) पुन्हा सरकारला काही सवाल केले आहेत. काल शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला होता तर आज त्यांनी राज्यातल्या नोकर भरतीचा (Unemployment) मुद्दा उपस्थित केला आहे.राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

पदं रिक्त, सेवा कशी देणार?

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

कोरोनामुळे भरती रखडली

राज्यात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय कोरनामुळे देशोधडीला लागले आहेत. असातच नोकरभरती रखडल्याने अनेकांसमोर रोजगाराचा सवाल उपस्थित झाला आहे. लवकरात लवकर नोकरभरती झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे जीवन पुन्हा उजळू शकते. त्यासाठी लवकरात लवकर नोकरभरती होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. हाच मुद्दा आता नाना पटोलेंनी उचलून धरला आहे.

फडणवीसांनी विधानसभेत मांडला महाविकास आघाडीचा “महाकत्तलखाना”, सरकारवर आरोपांची सरबत्ती

अजितदादा हे तुमच्याबद्दल आहे, फडणवीसांचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉंब, अजित पवार काय बोलणार?

महाजन ते मुनगंटीवार, एसीपी ते मुंबईचा सीपी, फडणवीसांनी सव्वाशे तासाचं स्टींग ऑपरेशन सभागृहात मांडलं, संवेदनशील भाग जशास तसा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.