Nanar Refinery Project : राज्याने लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, श्रीपाद नाईक यांची रिफायनरीबाबत भूमिका

काही लोकांनी या रिफायनरीली विरोध केला आहे. तर काहींनी हा प्रकल्प व्हावा अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोकणातील काही मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनाही निवेदन दिले आहे. आता केद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nanar Refinery Project : राज्याने लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, श्रीपाद नाईक यांची रिफायनरीबाबत भूमिका
लोकांच्या रोजगाराचा विचार करावा-श्रीपाद नाईकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 4:48 PM

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात रिफायनरीची (Nanar Refinery Project) मुद्दा गाजत आहे. त्यावरून अनेकदा भाजप आणि शिवसेना आमनेसामनेही आले आहेत. आधी शिवसेनेने (Shivsena) या प्रकल्पाला विरोध केला. त्यानंतर या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेत बदल करण्यात आला. शिवसेने दुसऱ्या जागेच्या पर्यायाचा विचार करण्याची केंद्रला विनंती केली. तर कोकणातूनही या रिफायनरीबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. काही लोकांनी या रिफायनरीली विरोध केला आहे. तर काहींनी हा प्रकल्प व्हावा अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोकणातील काही मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनाही निवेदन दिले आहे. आता केद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबात आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिफायनरीबाबत सरकारने व लोकांनी समन्वय साधला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

श्रीपाद नाईक काय म्हणाले?

तसेच रोजगारच्या दृष्टीने लोकांनी सुध्दा सखोल विचार करावा. कोणाच्या राजकीय भूमिका असतात. कोणाची वेगळी भूमिका असते आणि शासनाने लोकांना रोजगार कसा मिळेल, यासाठी सरकारने विचार करावा. तसेच सर्वच प्रकल्प येतात ते प्रदूषणकारी असतात असे नाही. केंद्र सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत व्यक्त केले, आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे प्रकल्प रखडला

वेगवेगळ्या राजकीय भूमिका आणि सुरूवातील स्थानिक लोकांनी केलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प अनेक दिवसांपासून रखडला आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेत अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले आहेत. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेऊन कोकणातील लोकांचा रोजगार हिरावून घेत आहे. तसेच कोकणाच्या विकासात अडथळ निर्माण करत आहे, असा सतत आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच शिवसेना नेतेही भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान झाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे, बारसु सोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक होत मोर्चेही निघाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Raj Thackeray : ‘बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही’, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला; तर औरंगाबादेत राज यांच्या सभेची जोरदार तयारी

भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.