नांदेडमध्ये शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला, 20 जणांना अटक, तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. या सर्व घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे. (Nanded Sikh people attacked police)

नांदेडमध्ये शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला, 20 जणांना अटक, तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
Nanded Sikh people attacked police
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:48 AM

नांदेड : नांदेडमध्ये शीख समुदायाकडून काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 60 जण हे आरोपी असल्याचे निष्पन्न झालं आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. (Nanded Sikh people attacked police 20 people arrest)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात 60 जण आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. या सर्व घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे.

नेमकं प्रकरणं काय? 

नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले.  तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

चार पोलीस कर्मचारी जखमी

“आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांचा नियोजित कार्यक्रम सुरु असताना निशान साहेब गेट नंबर 1 पर्यंत आलं. पण बाहेर काढण्यावरुन त्यांच्यात आपसात वाद झाला. 300 ते 400 जण हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले. त्यांनी पारंपरिक मार्गाने हल्लाबोल केला. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. (Nanded Sikh people attacked police 20 people arrest)

संबंधित बातम्या : 

VIDEO : नांदेडमध्ये लॉकडाऊन असताना शिख समुदायाकडून जंगी मिरवणूक, तुफान गर्दी, चार पोलीस जखमी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.