देवेंद्र फडणवीस यांना ‘त्या’ गोष्टीचा पश्चाताप होईल; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : नांदेडच्या कंधारमध्ये बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? वाचा...

देवेंद्र फडणवीस यांना 'त्या' गोष्टीचा पश्चाताप होईल; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 3:54 PM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कंधार नांदेड | 09 डिसेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं आहे. मी मराठा समाजाची बाजू लावून धरली आहे. सरकार ते किती गांभिर्याने घेतात, हे मला माहित नाही. आमच्या लेकरांचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करत ते पाहू आमचं लक्ष आहे. यांनी काय आश्वासन दिलं आहे, हे आम्हाला माहित आहे. आपल्या लेकरांच्या बाबतीत हे विधिमंडळ मध्ये काय मांडतात. याकडे आमचं लक्ष आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत निर्णय झाला नाही. तर यांच्यात लक्षात येईल आम्ही काय आहे ते…, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

फडणवीसांबाबत काय म्हणाले जरांगे?

आमचं आंदोलन शांततेत होणार. पण तेव्हा यांना एवढा पश्चाताप झालेला नसेल एवढा होईल.देवेंद्र फडणवीस त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते खऱ्या आणि पूर्वीच्या भूमिकेवर येतील. त्यांनी एकट्याचा दबाव घेऊ नये. आरक्षण मिळवण्याची ताकद सामान्य माणसात आहे. पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. अशा माणसाने वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगलीच्या गोष्टी करू नयेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. त्याचा एकल्याचा पश्चातप देवेंद्र फडणवीस यांना होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘ती’ भूमिका घ्यावी

कंधारमध्ये नोंदी असूनही नाही सांगत आहेत. त्यांनी अहवाल दिला आहे. पण अभ्यासकांना तिथं 27 नोंदी सापडल्या. मग अधिकारी जाणूनबुजून नोंदी नाहीत, असं म्हणतायेत का? अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मराठे पुन्हा उघडे पाडणार आहेत. कुणाच्याही दबावात न येता भूमिका जी होती, ती घ्यावी. मग मराठ्यांचा विचार तुम्ही सोडुन द्या, असं मनोज जरांगे म्हणाले.

“…तर 24 डिसेंबरनंतर फरक पडेल”

मराठवड्यात नोंदी कमी सापडतायेत. कारण अभ्यासक नाहीत. काही अधिकारी मुद्दामहून मनुष्यबळ देत नाहीत. वेळ देत नाहीत. सरकारने याबाबत काही केलं तर मग 24 डिसेंबरनंतर फरक पडेल. आम्ही या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू, असं मनोज जरांगे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.