संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कंधार नांदेड | 09 डिसेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं आहे. मी मराठा समाजाची बाजू लावून धरली आहे. सरकार ते किती गांभिर्याने घेतात, हे मला माहित नाही. आमच्या लेकरांचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करत ते पाहू आमचं लक्ष आहे. यांनी काय आश्वासन दिलं आहे, हे आम्हाला माहित आहे. आपल्या लेकरांच्या बाबतीत हे विधिमंडळ मध्ये काय मांडतात. याकडे आमचं लक्ष आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत निर्णय झाला नाही. तर यांच्यात लक्षात येईल आम्ही काय आहे ते…, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आमचं आंदोलन शांततेत होणार. पण तेव्हा यांना एवढा पश्चाताप झालेला नसेल एवढा होईल.देवेंद्र फडणवीस त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते खऱ्या आणि पूर्वीच्या भूमिकेवर येतील. त्यांनी एकट्याचा दबाव घेऊ नये. आरक्षण मिळवण्याची ताकद सामान्य माणसात आहे. पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. अशा माणसाने वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगलीच्या गोष्टी करू नयेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. त्याचा एकल्याचा पश्चातप देवेंद्र फडणवीस यांना होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कंधारमध्ये नोंदी असूनही नाही सांगत आहेत. त्यांनी अहवाल दिला आहे. पण अभ्यासकांना तिथं 27 नोंदी सापडल्या. मग अधिकारी जाणूनबुजून नोंदी नाहीत, असं म्हणतायेत का? अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मराठे पुन्हा उघडे पाडणार आहेत. कुणाच्याही दबावात न येता भूमिका जी होती, ती घ्यावी. मग मराठ्यांचा विचार तुम्ही सोडुन द्या, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठवड्यात नोंदी कमी सापडतायेत. कारण अभ्यासक नाहीत. काही अधिकारी मुद्दामहून मनुष्यबळ देत नाहीत. वेळ देत नाहीत. सरकारने याबाबत काही केलं तर मग 24 डिसेंबरनंतर फरक पडेल. आम्ही या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू, असं मनोज जरांगे म्हणाले.