गाढव बनले प्रमुख पाहुणे, महामूर्ख कविसंमेलनात राज्यातील नामवंत कवींचा सहभाग, कुठे रंगला कार्यक्रम?
या कवी संमेलनात राज्यातील नामवंत कवींनी हजेरी लावली द्विअर्थी कविता आणि अश्लील विनोदाने हे कविसंमेलन चांगलेच रंगले.
राजीव गिरी, नांदेड: राज्यभरात होळीनिमित्त (Holi) उत्साह पहायला मिळतोय. होळी तिथे हास्य विनोद हे समीकरण असतं. त्यातच उत्स्फूर्त कविसंमेलन असेल तर होळीची मजा द्विगुणित होते. होळीच्या कविसंमेलनाची नांदेडमध्ये (Nanded) अगदी वेगळी परंपरा आहे. इथे दरवर्षी होळीनिमित्त महामूर्ख कविसंमेलन भरतं. महाराष्ट्रात एकमेव असं हे संमेलन असतं. जिथे द्विअर्थी आणि शिव्यायुक्त कवितांचं सादरीकरण होतं. त्यामुळेच येथे महिला आणि लहान मुलांना प्रवेश नसतो. विशेष म्हणजे या ठिकाणी एका गाढवाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची परंपरा आहे. काल सोमवारीदेखील नांदेडमध्ये हे संमेलन पार पडलं.
केवळ पुरुषांसाठी असणारे हे एकमेव कविसंमेलन आहे. मूर्खांचा शिरोमणी असलेल्या गर्दभाचे स्वागत करून या कविसंमेलनाला सुरुवात करण्यात आली. या कवी संमेलनात राज्यातील नामवंत कवींनी हजेरी लावली होती.
या कवी संमेलनात राज्यातील नामवंत कवींनी हजेरी लावली द्विअर्थी कविता आणि अश्लील विनोदाने हे कविसंमेलन चांगलेच रंगले.
एका पेक्षा एक सरस शृंगार गीते, द्विअर्थी कविता, विनोद आणि मनमोहक नृत्य सादर करण्यात आले. होळीचा पारंपरिक आनंद लुटण्यासाठी या संमेलनाला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठाकूर गेल्या वीस वर्षांपासून या संमेलनाचे आयोजन करतायत. बनारस नंतर देशात नांदेडमध्येच अश्या प्रकारच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत.
कोकणात पारंपरिक शिमगा
कोकणात पारंपरिक शिमगा सर्वसामान्य नागरीकांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वांच्याच जिव्ह्याळ्याचा आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंतही त्यांच्या मुळ गावी पाली येथे ग्रामस्थांसोबत स्वत: ढोल ताशा वाजवत सहभागी झाले. पालक मंत्री उदय सामंत ढोल वाजवत सहभागी होताच ग्रामस्थांनीही मोठा जल्लोष केला. शिमगा उत्सवाचा पारंपरिक सोहळा रत्नागिरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलांय.