नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, वसंत चव्हाणांच्या जवळच्या व्यक्तीला तिकीट
नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
Nanded By-Election Congress Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ आता रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Congress nominates Ravindra Vasantrao Chavan as its candidate for Maharashtra’s Nanded Lok Sabha bye-elections and Jingjang M. Marak for Meghalaya’s Gambegre assembly constituency bye-elections. pic.twitter.com/sM3pOODgf0
— ANI (@ANI) October 17, 2024
अशोक चव्हाणांना दिला होता मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यानतंर भाजपकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडसह मराठवाड्यात फायदा होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र मराठवाड्यातील सर्व जागांवर भाजपचा पराभव झाला. नांदेड लोकसभा निवडणुकीची जागा वसंत चव्हाण यांनी लढवली. वसंत चव्हाण यांनी जवळपास ६० हजार मतांनी विजय मिळवत नांदेडची जागा काँग्रेससाठी खेचून आणली. भाजपचा नांदेडमधील पराभव अशोक चव्हाणांसाठी मोठा धक्का मानला गेला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला
मात्र खासदार झालेल्या वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्टला निधन झालं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. यानुसार येत्या २० नोव्हेंबरला नांदडेमध्ये विधानसभेसह लोकसभेसाठीही मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक संपूर्ण वेळापत्रक
निवडणूक अधिसूचना – २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
निकाल – २३ नोव्हेंबर २०२४