Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राजसाहेब मला माफ करा” सुसाईड नोट लिहित मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

राजसाहेब मला माफ करा सुसाईड नोट लिहित मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 3:05 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोट लिहित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. (Nanded MNS City President hangs self apologize Raj Thackeray in suicide note)

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी टोकाचे पाऊल उचलले. इरावार यांनी काल (शनिवार 15 ऑगस्ट) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

काय आहे सुसाईड नोट?

अखेरचा जय महाराष्ट्र

“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’

“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील”

“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो.” असे सुनील इरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

(Nanded MNS City President hangs self apologize Raj Thackeray in suicide note)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.