मराठवाड्यातील आमदाराला मंत्रिपदाचे वेध; म्हणाले, एकनाथ शिंदेसाहेब दिलेला शब्द पाळतील…

MLA Balaji Kalyankar About Ministership : सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही मंत्रिपदाबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर...

मराठवाड्यातील आमदाराला मंत्रिपदाचे वेध; म्हणाले, एकनाथ शिंदेसाहेब दिलेला शब्द पाळतील...
एकनाथ शिंदे, नेते शिवसेनाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 11:14 AM

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. मात्र येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अशात अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही मंत्रिपद मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील. मला आशीर्वाद देतील, असा मला विश्वास आहे, असं बालाजी कल्याणकर यांनी म्हटलं आहे.

बालाजी कल्याणकर यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे आहे. सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना कल्याणकर यांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली आहे. नांदेड उत्तरच्या जनतेने मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आभार मानतो. 50 वर्षात झाला नाही. तेवढा विकास नांदेड उत्तर मतदारसंघात शिंदेसाहेबांमुळे झाला आहे. जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी होतो. साहेबांनी जो मला शब्द दिला तो साहेब पूर्ण करतील हे मी 100% सांगतो, असं कल्याणकर म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांची भावना आहे आमदार बालाजी कल्याणकर मंत्री झाले पाहिजेत. आमची सगळ्यांची भावना आहे ती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. लाडक्या बहिणींची भावना आहे की शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं बालाजी कल्याणकर म्हणालेत. पूर्वी गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीससाहेब यांच्याकडे होतं. महायुतीचे मोठे नेतृत्व शिंदे साहेबाला न्याय देतील हे सांगतो, असं म्हणत कल्याणकर यांनी गृमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं वारंवार म्हणण्यात येत आहे. यावरही बालाजी कल्याणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी सगळ्यांचीच भावना आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे की आमदार बालाजी कल्याणकर मंत्री व्हावेत अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत…. तिघांचं सरकार आहे सर्व पक्ष एकत्र येऊन ठरवत असतात. येणाऱ्या मुख्यमंत्र्याला मी शुभेच्छा देतो, असं कल्याणकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.