Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Crime: दरोडा टाकणार इतक्यात पोलिसानीच टाकली धाड; नांदेडमध्ये पाच जणांच्या मुसक्या आवळल्या

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. दरोडा टाकणाऱ्या या टोळीकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला गेला आहे.

Nanded Crime: दरोडा टाकणार इतक्यात पोलिसानीच टाकली धाड; नांदेडमध्ये पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
दरोडा टाकणारी टोळी गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 3:23 PM

नांदेड: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Nanded Police) अटक केली आहे. या पाच आरोपींकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतुस, एक एअरगण , चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील श्रावस्तीनगर (Shravastinagar) भागातील नाल्याच्या झुडपात हे आरोपी लपून बसले होते. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. ही टोळी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर लोकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूट करत होती. यावेळी दरोडा (Robbery) टाकण्यापूर्वीच ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकलीय.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. दरोडा टाकणाऱ्या या टोळीकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला गेला असून त्यांच्या या टोळीत आणखी कोणा कोणाचा समावेश आहे त्याचा तपासही नांदेड पोलिसांकडून चालू आहे.

आणखी तपास करणार….

गेल्या काही दिवसांपासून नांदेड परिसरात छोट्या मोठ्आ गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आताही ज्या दरोडेखोरांना अटक केली गेली आहे, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास उलगड्याची शक्यता पोलिसांनी वर्तवण्यात आली आहे. या पाच आरोपींकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतुस, एक एअरगण , चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला गेला असल्याने या शस्त्रस्त्रांचाही तपास केला जाणार आहे.

एअरगण, जिवंत काडतूस त्यांच्याकडे सापडली असल्याने त्याचा धाक दाखवून आणि कोणा कोणाला त्यांनी लुटले आहे का याचाही तपास केला जाणार असल्याचे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. संबंधित बातम्या

आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?

Raghunath Kuchik Case Pune: तर शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करीन, रघुनाथ कुचिक यांनी दबाव टाकत धमकी दिल्याचा पीडीत तरुणीचा आरोप

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.