Nanded | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचे गूढ कायम, CBI कडे तपासाची मागणी, खा. चिखलीकर उद्या निदर्शनं करणार

नांदेड पोलीस या तपासात अपयशी ठरत असून या प्रकरणाचा तपास तत्काळ सीबीआयकडे देण्याता यावा, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Chikhalikar) यांनी केली आहे. या मागणीसाठी चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nanded Collector Office) निदर्शने करण्यात येणार आहेत.

Nanded | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचे गूढ कायम, CBI कडे तपासाची मागणी, खा. चिखलीकर उद्या निदर्शनं करणार
संजय बियाणी यांच्या हत्येचे गूढ कायम Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:08 PM

नांदेड : शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटले आहेत. तरीही बियाणींच्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. नांदेड पोलीस या तपासात अपयशी ठरत असून या प्रकरणाचा तपास तत्काळ सीबीआयकडे देण्याता यावा, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Chikhalikar) यांनी केली आहे. या मागणीसाठी चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nanded Collector Office) निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनांमध्ये विविध सामाजिक संघटना, व्यापारी, राजकीय मंडळी आणि नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.

नांदेडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रचंड बोकाळली आहे. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यानेच माफियागिरी आणि गुन्हेगारीला उधाण आले आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्वच भागात अवैध धंदे बिनबोभाटपणे सुरू आहेत. गोळीबार, तलवारबाजी, चाकू, खंजीरने मारून लुटण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. एका घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच दुसरी घटना घडत असल्याने नांदेड शहरातील डॉक्टर्स, वकील, कोचिंग क्लासेस चालक , उद्योगपती, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आरोप खासदार चिखलीकर यांनी केले आहेत.

बियाणींच्या तपासासाठी भाजप आक्रमक

5 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तीन वर्षापूर्वीच बियाणी यांच्यावर खंडणी मागण्यासाठी पिस्तूल रोखण्यात आले होते. त्या वेळेसही पोलिसांनी कचखाऊ भूमिका घेतली तर नंतर पोलिसांनी बियाणी यांना दिलेली संरक्षणही काढून घेतले. एकूणच परिस्थिती पाहता हे सर्व प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट वाटत आहे. त्यामुळे नांदेड पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावणे शक्य नाही, महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास लावू शकत नाहीत, असा गंभीर आरोप करत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. आता याच मागणीसाठी दि.20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता निदर्शने आयोजित करण्यात आले आहेत. व्यापारी, डॉक्टर, वकील प्रतिष्ठित नागरिक, माहेश्वरी समाज बांधवांनी आणि नांदेडकरांनी या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केली आहे.

इतर बातम्या-

नाशिकमध्ये भोंग्यांचं डेसिबल मोजण्यास सुरुवात

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.