Nanded | नांदेड स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटेंच्या पुढाकारात मुंबईत सोहळा

जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तरमधील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव. खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.

Nanded | नांदेड स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटेंच्या पुढाकारात मुंबईत सोहळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 1:48 PM

नांदेडः एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील असंख्य चेहरे शिंदे गटात शामील झालेत. त्यामुळे शिवसेनेतील रिक्त झालेली पदे भरण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विविध जिल्ह्यांमधील शिवसेना (Shivsena) नेते अॅक्टिव्ह झाले आहेत. शिवसेनेला बळकटी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक कामाला लागले आहेत. नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तरमधील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेनेत या सदस्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. नांदेडमधील आमदार बालाजी कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे शेकडो कार्यकर्ते आता शिंदे गटात असतील.

शिवसेनेची पुनर्बांधणी

नांदेड जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेत गेल्या महिन्यात झालेल्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि शिवसेनेला शह देण्याचा काही नतद्रष्ट्यांनी प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेतून सत्तेच्या लोभापायी आमिषाला बळी पडून आमदार गेले असले तरी शिवसैनिक आजही शिवसेना आणि मातश्रीशी इमान बाळगून आहेत, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. असंख्य राजकीय घडामोडींनंतर पुन्हा शिवसेना कामाला लागली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेची आता पुनर्बांधणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

नांदेड शिवसेनेत नवे कोण?

जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तरमधील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव. खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, शहराध्यक्ष शुभम पाटील नादरे, तालुका सचिव ओम पाटील ढगे, शहर उपाध्यक्ष नागेश पाटील मोरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष अजय देणे, जिल्हा सचिव संतोष पाटील नादरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास पाटील जोगदंड, तालुका संपर्कप्रमुख गोपाळ पाटील कदम, नायगावचे तालुकाध्यक्ष मारोती पाटील का होले, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी माधव दाळपसे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश कला आहे. यावेळी सहसंपर्कप्रमुख प्रकाश भारावार, धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, शाखाप्रमुख बाळासाहेव निळेकर, माजी नगरसेवक आनंदराव जाधव आदींची उपस्थिती होती.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.