Nanded: देव्हाऱ्यासह सगळे देव सरकारच्या हवाली करणार असल्याची महादेव कोळी समाजाची भूमिका

हिंदू देव देवतांचे पूजन करतात म्हणून या समाजाला जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार

Nanded: देव्हाऱ्यासह सगळे देव सरकारच्या हवाली करणार असल्याची महादेव कोळी समाजाची भूमिका
महादेव कोळी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 10:29 AM

नांदेड : देवपूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate) नाकारल्याची घटना नांदेडमध्ये (nanded) उघडकीस आली आहे. त्यामुळे आता देव्हाऱ्यासह सगळे देव सरकारच्या हवाली करणार असल्याची भूमिका महादेव कोळी समाजाने घेतली आहे. त्यासाठी महादेव कोळी समाज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर (collector office) मोर्चा काढून घरातले सगळे देव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील खरटवाडी या गावातून या अनोख्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गावात राहणाऱ्या मयुरी पुंजरवाड या तरुणीने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे. तरुणी सध्या एमडीचं शिक्षण घेत आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे शासकीय सेवेत असणाऱ्या मयुरीच्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले. मात्र मयुरीला महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास समितीने नकार दिला आहे. जात वैधता समितीने दिलेल्या अहवालात तुम्ही हिंदू देव देवतांचे पूजन करता म्हणून तुम्ही महादेव कोळी नाहीत असा अजब निष्कर्ष काढला आहे.

“देवपूजा करता म्हणून जर आम्हाला जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात येत असेल, तर आम्ही या देवाचा त्याग करतो अशी भूमिका या समाजाने घेतली आहे. यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महादेव कोळी समाज भव्य मोर्चा काढून घरातल्या देवांच्या मुर्ती, देव्हारे आणि प्रतिमा प्रशासनाच्या हवाली करणार आहे” अशी माहिती मयुरी पुंजरवाड यांनी दिली आहे.

महादेव कोळी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.