काँग्रेसध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार, त्यामुळे…; अजित पवार गटाच्या मंत्र्याच्या विधानाने चर्चाच चर्चा

Anil Patil on Congress : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपद यावर देखील भाष्य केलंय. विधान परिषद निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर...

काँग्रेसध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार, त्यामुळे...; अजित पवार गटाच्या मंत्र्याच्या विधानाने चर्चाच चर्चा
मंत्री अनिल पाटील
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 1:31 PM

काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 288 जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेच्या एक मुखवटा पुढे करून काँग्रेसमध्ये खलबत्त व्हायला लागले आहे. राज्यात काँग्रेसची ज्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे. त्यावरून ठाकरे आणि पवार काँग्रेसला कुठेतरी धोका देऊ शकतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला एकटे पाडतील अशी काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आमच्याकडे मतदानाच्या संख्याबळ पूर्ण आहे. त्यामुळे आमचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीकडे मतांच्या संख्याबळ नाही आहे. फक्त पैशांच्या भरोशावर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत, असा आरोपही अनिल पाटलांनी केला आहे. नंदुरबारमध्ये अनिल पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मराठा आरक्षणावर अनिल पाटील काय म्हणाले?

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत. त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. आज मनोज जरांगे पाटील हिंगोलीत आहेत. जरांगे पाटील यांची रॅली सध्या सुरू आहे. यावरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी काय करावं? हा त्यांच्या निर्णय आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मराठा समाजातील सग्या सोऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवारांना उभं करावं का नाही करावं हा त्यांच्या भाग आहे. कुठलाही उमेदवार बिनविरोध निवडून येत नाही, असंही अनिल पाटील म्हणाले.

लाडकी बहिण योजनेवरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला पात्र ठरतील. या योजनेपासून कुठलीही महिला वंचित राहणार नाही. 31 ऑगस्ट या योजनेची मुदत आहे. त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी लवकर सोडवल्या जातील, असं अनिल पाटील म्हणाले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.