नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांसह हजारो बालकांचं स्थलांतर, मुलांसाठी आलेल्या पोषण आहाराचं काय होतं?

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांनी रोजगारासाठी स्थलांतर केल्यानं त्यांच्या सोबत जाणाऱ्या मुलांना पोषण आहार कसा मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ( Nandurbar Migration Nutrition Food )

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांसह हजारो बालकांचं स्थलांतर, मुलांसाठी आलेल्या पोषण आहाराचं काय होतं?
स्थलांतरित बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झालाय
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 1:46 PM

नंदुरबार: जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि कुपोषण यांचा संबंध असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे. नंदुरबारमधील हजारो कुटुंब रोजगारासाठी गुजरात राज्यात स्थलांतर करत असतात, या कुटुंबासोबत त्यांची लहान मुले जात असतात. स्थलांतरामुळं लहान बालकं अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारापासून वंचित राहतात. स्थलांतरित मुलांच्या नावाने येणाऱ्या पोषण आहाराचं पुढं काय होतं?, प्रशासन स्थलांतर झालेल्या बालकांची खरी आकडेवारी देते का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Nandurbar forty thousand families migrated to Gujrat but facing trouble of Malnutrition)

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबाचं स्थलांतर

नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 40 हजार कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करतात. या कुटुंबासोबत त्यांची लहान मुले ही जात असतात. या मुलांसाठी सरकारच्या विविध योजनांमधून पोषण आहार येत असतो. हा पोषण जातो कुठे? कुपोषणासाठी येणाऱ्या योजनांवर शासकीय अधिकारी डल्ला मारत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग देत असलेली आकडेवारी खोटी आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य भारत गावित यांनी केला आहे.

जिल्ह्यातून आता पर्यंत 1 हजार 369 बालकांनी स्थलांतर केलं आहे. फक्त 9 गर्भवती मातानी स्थलांतर केल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड यांनी दिली आहे. मात्र, एकीकडे 40 हजारांपेक्षा जास्त परिवाराचे स्थलांतर होत असते. मग, फक्त 1हजार बालकांची संख्या देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे का असा सवाल विचारला जात आहे.

आकडेवारीचा खेळ?

कुपोषण निर्मूलनासाठी महिला आणि बालविकास विभागाला कोट्यवधींचा निधी येत असतो. मात्र, आकडेवारीचा खेळ खेळला जातो आणि पोषण आहार असो की अन्य योजना कोण घश्यात घालत आहे. त्याची चौकशी होऊन झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, पालघरमध्ये वाढलेल्या कुपोषणाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ झाल्यानं भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.  असून महा विकास आघाडी सरकार भाजप ने तयार केलेल्या योजनांची अमंलबजावणी करत नसल्याने कुपोषणात वाढ झाल्याचा आरोप भाजप चे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे

संबंधित बातम्या:

अण्णांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न तर आघाडीचा भडकवण्याचा? वाचा गृहमंत्री देशमुख काय म्हणतायत?

वाळू तस्करांची हिम्मत वाढली, नायब तहसीलदार-तलाठ्यावर चाकू हल्ला

(Nandurbar forty thousand families migrated to Gujrat but facing trouble of Malnutrition)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.