जर शरद पवार काँग्रेससोबत आले तर भाजप…; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Nana Patole on Devendra Fadnavis BJP NCP Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नंदुरबारमध्ये बोलताना नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं? विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर नाना पटोले काय म्हणाले? वाचा सविस्तर...
लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल. या निवडणुकीनंतर त्यांची शिवसेना काँग्रेस बरोबर विलीन होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, काही दिवसात शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. मात्र त्यावेळेस भाजप कुठे असणार?, असा सवाल करत नाना पटोलेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.
बारामतीच्या लढतीवर पटोले म्हणाले…
बारामतीत अजित पवार गटाच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला दिला आहेत. त्यामुळे अजित पवार हे तानाशाही सोबत आहेत म्हणून या तक्रारी झालेल्या आहेत. दत्तामामा भरणे यांनी कार्यकर्त्यांची ज्या पद्धतीने बोलले आहेत ते तानाशाही पद्धतीने ते बोलत होते. नरेंद्र मोदीच्या थोडाफार गुण अजित पवार गटात आलेला आहे. त्याच्याच एक चित्र काल आपल्याला दिसला आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नाही. त्यांचं वैयक्तिक मत होतं, ही भूमिका आम्ही आमच्या प्रभारींकडे मांडली आहे. मोदी सरकार हे तानाशाहसारखे वागत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री या सर्व विषयावर जनतेने उत्तर द्यायचं ठरवलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकार पडणार, असं नाना पटोले म्हणाले.
निवडणुकीच्या निकालावर भाष्य
20 मेला मतदान संपत आहेत. परंतु चार जूनला मतमोजणी घेतली जात आहे. याचा अर्थ मोदी की मन की बात आहे. आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे. प्रियंका गांधी यांची नंदुरबार येथे होणारी सभा रद्द झाली. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश जबाबदारी दिलेली आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला आहे.