Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग

ताज्या आकडेवारीनुसार येथे एकूण 16 पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. (Nandurbar Navapur bird flu cases)

Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग
नवापूरमध्ये कोंबड्या मारण्यात येत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 2:20 PM

नंदूरबार : बर्ड फ्लूने पुन्हा एकादा डोके वर काढले आहे. नवापूर तालुक्‍यात पक्षांना नव्याने बर्ड फ्लूची लागण होत असल्याचे समोर आले आहे. येथे नव्याने 8 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली. ताज्या आकडेवारीनुसार या भागात एकूण 16 पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. आगामी काळात नवापूरमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांना मारण्यात येणारआहे. (Nandurbar Navapur bird flu cases increased over six 6 lakh of hens will be killed in future)

बर्ड फ्लूमुळे राज्यातील तसेच देशातील कुक्कुटपालक व्यावसायिक हैराण आहेत. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे व्यावसायिकांना लाखो कोंबड्यांची किलिंक करावी लागत आहे. नंदूरबारमध्ये तर बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. येथे आतापर्यंत एकूण 16 पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना या आजाराची लागण झालीये. त्यामुळे नवापूरमध्ये आतापर्यंत अडीच लाख कोबंड्यांची किलिंग पूर्ण झाली आहे. तसेच, बर्ड फ्लूचा वाढता प्रभाव लभात घेता नवापूरमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग केली जाणार आहे.

या सर्व प्रकारामुळे येथील प्रशासनाची धावपळ उडाली आहे. अजूनही काही अहवला प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दिवसात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बळ

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना 12 जानेवारी 2021 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावलेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

पक्षी पाळणाऱ्यांनो नियम पाळा

कुक्कुटपालन करणाऱ्यांनी किंवा कुक्कुट पक्षी पाळणाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Bird Flu | अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे की नाही? वाचा काय सांगतात FSSAI गाईडलाईन्स

Bird Flu : मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडला, 5 हजार कोंबड्यांची विल्हेवाट

Bird Flu | पुणे सोलापूर सह नांदेडमधील दोन तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

(Nandurbar Navapur bird flu cases increased over six 6 lakh of hens will be killed in future)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.