नारायण पाटील यांनी शिवबंधन तोडलं, रश्मी बागल यांच्याविरोधात शड्डू ठोकला!

शिवसेनेने नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.  

नारायण पाटील यांनी शिवबंधन तोडलं, रश्मी बागल यांच्याविरोधात शड्डू ठोकला!
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 12:30 PM

सोलापूर : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.

उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदाराऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ टाकली असा आरोप नारायण पाटील यांचा आहे.

“विद्यमान शिवसेना आमदाराला डावल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनामा देऊ अशी धमकी दिली आणि करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची केली. मला एबी फॉर्म मिळत असतानाही सावंतांच्या खेळीमुळे माझी उमेदवारी कापली गेली” असा आरोप शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेत निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायाला तोंड फुटलं आहे.

पदाधिकारी नाराज?

शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावर करमाळा पंचायत समिती आणि करमाळा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणली आहे. यामुळे करमाळ्यात शिवसेनेची ताकद वाढली असतानाही, नारायण पाटील यांना डावलल्यामुळे करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता रश्मी बागल यांचे काम न करण्याचा  इशारा दिला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले की, करमाळ्यातील निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नारायण पाटील यांच्यासोबत असतील.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.