विकास कामांना विरोध आणि उद्घाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना : नारायण राणे

भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम या आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केलीय.

विकास कामांना विरोध आणि उद्घाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना : नारायण राणे
केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 4:21 PM

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम या आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केलीय. विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोब म्हणजे शिवसेना, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. त्यांच्यासह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले (Narayan Rane criticize Shivsena while inauguration of Lifetime medical college).

नारायण राणे म्हणाले, “या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून खूप विरोध झाला. शिवसेनेने याला खूप विरोध केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी या ठिकाणी नवं रुग्णालय उभारणार आणि त्यासाठी 900 कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. मात्र, तिजोरीत एक पैसा नाही आणि चालले 900 कोटी रुपये द्यायला.”

“कोकणात विमानतळ होणार होतं तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकास कामांना विरोध करायचा आणि उद्धाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं येऊन बसायचं यालाच शिवसेना म्हणतात,” असंही मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

‘डेअरिंगवाला माणूसच उद्घाटनाला हवा’

यावेळी नारायण राणे यांनी उद्धाटनाला अमित शाह यांनाच बोलावण्याचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले, “वाद झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालं. त्यामुळे याच्या उद्घाटनाला देखील असाच डेअरिंगवाला माणूस हवा अशी मागणी सर्वांनी केली. मी तुम्हाला दिल्लीत भेटून महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली. तुम्ही तात्काळ होकार दिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार.”

हेही वाचा :

नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा

नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार

आज अमित शाह कोकणात, आघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती? काँग्रेसनं संधी दिली?

व्हिडीओ पाहा :

Narayan Rane criticize Shivsena while inauguration of Lifetime medical college

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.