Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचे गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत, या आरोपांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचे गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 7:13 PM

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी देखील नारायण  राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

‘ माझं तेच काम आहे, यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल माझ्या वडिलांवर असेल, माझ्या पक्षावर असेल, त्यांनी आरोप केले.  त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  आज मी एक पत्र लिहिलं आहे. मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं होतं? 

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आल्याचा त्यांनी दावा केला आहे. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता असा आरोपही यावेळी राणे यांनी केला.

आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट.
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री.
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला.