Narayan Rane : गद्दारी करणाऱ्या सेनेनं हिंदुत्वाचे उपदेश देऊ नये, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं-नारायण राणे

आता राज ठाकरेंच्या आयोध्येच्या दौऱ्यावरही जोरदर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (Narayan Rane) पुन्हा याच मुद्द्यावरून शिवसेनेला जोरदार टोलेबाजी केली आहे. सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेने हिंत्वाचे उपदेश देऊ नये, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

Narayan Rane : गद्दारी करणाऱ्या सेनेनं हिंदुत्वाचे उपदेश देऊ नये, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं-नारायण राणे
Narayan RaneImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 8:49 PM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वावरून (Hindutva) जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेने हिंदुत्व सोडल्याचा आरोप सतत होत आहे. तर आता राज ठाकरेंच्या आयोध्येच्या दौऱ्यावरही जोरदर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (Narayan Rane) पुन्हा याच मुद्द्यावरून शिवसेनेला जोरदार टोलेबाजी केली आहे. सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेने हिंत्वाचे उपदेश देऊ नये, असे नारायण राणे म्हणाले आहेत.तसेच राज ठाकरे यांना भाजपची सोबत करावीशी वाटली तर त्यात चूक काय?कोणीही कुणाच्या सुरात सूर मिसळू शकतो. त्यात चुकीचं काय मला वाटत नाही. आम्ही कसं वागावं हे काय मुख्यमंत्री सांगणार का? तसेच त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही वागणार नाही. स्वतःचा निष्ठावान असेल तर दुसऱ्यांना उपदेश करू शकतो पण स्वतः गद्दारी करणारा दुसरा काय सांगणार? असा थेट सवाल करत राणे यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

संजय राऊत, जयंत पाटलांचा समाचार

तसेच शिवसेना नेते संजय राऊतांवरही त्यांनी जोरादर प्रहार केला आहे. सध्यातरी संजय राऊत यांनी बोलू नये. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांच्या मागे चौकशी लागल्यावर ते काय बोलतात ते लोकांना कळत नाही. काय भाषा त्यांची, काय शिव्या, असा व्यक्ती ना नेता होऊ शकतो, ना संपादक, त्यामुळे त्ंयाच्या विचारांची दखल घेण्यासारखं काहीच नाही, असे म्हणत राणेंनी राऊतांवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच जयंत पाटील निवडणुकीआधी भाजपमध्ये येत होते. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असा गोप्यस्फोटही नारायण राणे यांनी केला आहे. राष्ट्रवादी सोयीचे राजकारण करत आहे, ते मतलबी राजकारणी आहेत. कधीही कुणाच्या सोबत जातील. जिथे त्यांना काही साध्य करता येईल अशी जागा ते शोधतात आणि त्यालाच राष्ट्रवादी म्हणतात, असे म्हणत त्यांनी जयंत पाटलांचाही समाचार घेतला आहे.

भाजपला काही फरक पडत नाही

कोल्हापूर निवडणुकीच्या निकालावरही नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला काही फरक पडत नाही. भाजपची केंद्रात सत्ता आहे. माननीय मोदी पंतप्रधान आहेत, त्यांनी देशहितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी या योजना केल्.या करोनामधून वाचवलं. त्या मोदींचा कारभार जनतेला पसंत आहे आणि लोक ते मान्य करतात आणि लोक मान्य करतात की असे पंतप्रधान झाले नाहीत. हे सगळे एकत्र येऊन बघा काय स्थिती झालेली आहे. आमचे 302 खासदार आहेत. शिवसेनेने जर आत्ता निवडणूक लढवली तर पाचही खासदार येणार नाहीत. मोदींच्या नावावर 18 खासदार आले. अशा लेचापेचा लोकांना मी घाबरत नाही. आधी स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मग दुसऱ्यांना बोला, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

मी काहीही बेकायदेशीर केलं नाही

तसेच त्यांच्या बंगल्याला मिळालेल्या नोटीसाबाबत बोलताना राणे म्हणाले, मी बेकायदेशीर असं काहीच केलेले नाही. महापालिकेची सर्व कागदपत्रं घेतल्यानंतरच गृह प्रवेश केलेला आहे. मी रीतसर महानगरपालिकेला प्लान देऊन बांधकाम केलेले आहे. जे काही अनाधिकृत दाखवतात त्याचा माझ्याकडे एफएसआय शिल्लक आहे. मला नियमित करून द्या आणि त्याच स्वरूपाचा अर्ज मी केला होत आणि त्यासाठीचे काही पुरावे मागितले होते ते आम्ही देत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सुडाचे राजकारण सुरू

तर हे सुडाचे राजकारण आहे. विरोधी पक्षात माझे बरेचसे मित्र आहेत. सगळ्याच पक्षात आहेत. यांना कारभार जमत नाही म्हणून यांच्या त्यांच्यावर कारवाई करतात. आता मुंबईची अवस्था पडताळ शहर झाला आहे. मुंबई महापालिकेचा कारभार म्हणजे फक्त जनतेचा पैसा यांना खेचायचा आहे. त्यासंदर्भात काहीच बोलत नाहीत. त्यांच्या मातोश्रीच्या बाहेर बेहराम पाडा आहे. तिथेच सगळच शंभर टक्के अनधिकृत आहे. तिथून मुख्यमंत्री रोज दिसतात पण डोळ्यावर पट्टी असते. त्यांच्या पक्षाच्या आज कितीतरी लोकांचे अनधिकृत बांधकाम आहेत. मी कधीच तक्रार केलेली नाही मराठी माणसाने बंगला बांधला की तो त्यांना दिसला आणि त्याच्यातून सूड उगवला. आणि मला नोटीस पाठवली. मात्र आम्हाला कोर्टावर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आहे.

Sanjay Rathod : संजय राठोड यांचा “वन”वास संपणार? वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Pritam Munde : प्रीतम मुंडेंकडून राजेश टोपेंचं कौतुक तर राज ठाकरेवर नाराजी, ऐका काय म्हणाल्या?

Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.