Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर, मुक्ता दाभोलकर काय म्हणाल्या ?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला . सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला . सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल अखेर लागला आहे. या प्रकरणातील 5 आरोपींपैकी इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोकलकर यांनी प्रतिक्रिया दिली. विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो , ११ वर्षांनी या खटल्याचा निकाला लागला आहे. जे खरे शूटर्स होते, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे.आम्ही समाधानी आहोत, असं त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर ?
गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा 2018 साली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे आरोपी पकडले गेले. त्याच्याआधी जवळपास 2013 ते 2018 अशी पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला असं वाटतंय की जे खरे शूटर्स होते, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे.आम्ही समाधानी आहोत. ही संपूर्ण ११ वर्षांची लढाई महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक ही लढाई लावून धरली. त्यामुळे ११ वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो ही भावना आमच्या मनात जागृत राहिली आहे. आणि लोकशाहीसाठी देखील ही उपकृत भावना आहे, अशी प्रतिक्रिया मु्क्ता दाभोलकर यांनी दिली.
या प्रकरणातील दोन आरोपींना शिक्षा झाली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र ज्या तीन जणांना शिक्षा झाली नाही, ज्यांना निर्दोष सोडण्यात आलं त्यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ. आमच्या वकिलांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात पुढे वाटचाल करू असे त्या म्हणाल्या.