आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार, माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकले, नरेंद्र पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. Narendra Patil Uddhav Thackeray

आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार, माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकले, नरेंद्र पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
उद्धव ठाकरे, नरेंद्र पाटील
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 6:50 PM

नवी मुंबई: माथाडी कामगारांचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नसल्याने यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. माथाडी कामगार हे सर्वपक्षीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Narendra Patil accused CM Uddhav Thackeray did politics in issue of Mathadi workers)

सर्व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र

मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगून देखील ते गांभीर्याने घेत नसल्याने भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माथाडी बोर्डाचे ३६ चेअरमन यांना पत्र व्यवहार केला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. बाजार समितीच्या सर्व घटकांची कृती समिती तयार करण्यात येणार असून बाजार आवारातील सर्व घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. शिवाय, माथाडी कामगारांचं अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि संबंधित अधिकारी यांची जमेल त्या मार्गाने भेट घेऊन हे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत, अशी मागणी केलीय. जर सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर येत्या आठवड्यात कशा प्रकारे आंदोलने करायची त्याची दिशा ठरवून एकमताने आंदोलने करण्याच्या भूमिकेत बाजार समितीचे घटक विचार करत आहेत, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा

माथाडी व बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या घटकांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे. रेल्वे, परिवहन बस व रक्षा कवच यामध्ये समाविष्ट करावे. २०२० मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कृती समिती स्थापन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या निवेदनाची जर सरकारने योग्य दाखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करून आमच्या हक्कासाठी लढू, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी चर्चा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्वरित बोलावूनन घेतले. माथाडी कामगारांची भूमिका त्यांनी समजून घेतली. यावर त्यांनी ती भूमिका लगेच पटली आणि त्यांनी मुख्यमंत्र्याना पत्र व्यवहार केला तर मुख्य सचिव यांना देखील फोनवरून संपर्क साधला आहे. माथाडी कामगारांच्या मागण्या रास्त आणि योग्य असल्याचे सांगितले.

राष्टवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करणार आहे. तसेच संपूर्ण राज्यातून आम्ही ही मागणी करणार असून जर एकत्र येऊन हे केले गेले नाही. तर भविष्यात होणाऱ्या परिणामांना मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागले. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील लोकांना मुख्यमंत्री आवाहन करत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांचा विचार करत नाहीत. अशावेळी त्या कामगारांनी काय करायचे? असा सवाल माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

 संबंधित बातम्या:

मराठा आरक्षण ते प्राचीन मंदिरांचे संवर्धन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील नऊ मुद्दे!

चंद्रकांत पाटलांचं आवाहन उद्धव ठाकरे स्वीकारतील? फडणवीसांना घेऊन मोदींना भेटतील?

(Narendra Patil accused CM Uddhav Thackeray did politics in issue of Mathadi workers)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.