प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार, मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याचा आरोप
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी केला आहे.
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.
त्यामुळे मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन तथ्य आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन दिलं.
आडम मास्तरांना लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. पोलिसांमार्फत चौकशी करुन कारवाई करु असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले.
प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया
आडम मास्तर यांच्या आरोपात तथ्य नाही. मी दरवर्षी कृतज्ञता व्यक्त करत असते, मी नेहमीच महिलांना या गोष्टी देत असते. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी कॅमेऱ्यासमोर आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीकडे व्यक्त केली.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सध्या काँग्रेस प्रणिती शिंदे या प्रतिनिधीत्व करतात. प्रणिती शिंदे यांनी माकपाचे तत्कालिन आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय जीवनाची ओपेनिंग केली. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि शिवसेनच्या उमेदवारांना धूळ चारून विजय मिळवला.
संबंधित बातम्या
सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान