Nashik | कोरोनामुळे पुन्हा 4 जणांचा मृत्यू, किती रुग्णांवर उपचार सुरू, काय आहे आजचा रिपोर्ट?
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 58 हजार 680 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिकः नाशिक (Nashik) शहरात सुरू असलेले कोरोनाचे (Corona) मृत्यूतांडव अजून काही थांबलेले दिसत नाही. आता 6 फेब्रुवारी रोजी पु्न्हा एकदा कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्याही सिन्नर, निफाड, सुरगाणा, कळवण, नांदगावमध्ये रुग्णवाढ आहेच. मात्र, बहुतांश जण ओमिक्रॉनचे (Omicron) पेशंट असल्याने त्यातल्या अनेकाना रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. मात्र, गंभीर रुग्णांचे मृत्यू होताना दिसत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 58 हजार 680 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 350 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 845 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
कोठे आहेत रुग्ण?
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 110, बागलाण 90, चांदवड 90, देवळा 105, दिंडोरी 105, इगतपुरी 27, कळवण 127, मालेगाव 44, नांदगाव 103, निफाड 217, पेठ 84, सिन्नर 274, सुरगाणा 119, त्र्यंबकेश्वर 65, येवला 98 असे एकूण 1 हजार 658 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 हजार 942, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 67 तर जिल्ह्याबाहेरील 134 रुग्ण असून असे एकूण 4 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 72 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्णांमध्ये नाशिक 40, बागलाण 22, चांदवड 12, देवळा 13, दिंडोरी 28, इगतपुरी 5, कळवण 18, मालेगाव 20, नांदगाव 6, निफाड 49, पेठ 8, सिन्नर 34, सुरगाणा 53, त्र्यंबकेश्वर 9, येवला 28 असे एकूण 345 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
बरे होण्याची टक्केवारी किती?
नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.61 टक्के, नाशिक शहरात 97.41 टक्के, मालेगावमध्ये 96.89 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.82 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.31 टक्के इतके आहे.
आजपर्यंत किती झाले मृत्यू?
नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनामुळे आजपर्यंत 4 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 77 जणांचा कोरोमुळे मृत्यू झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 845 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय अजूनही मृत्यू होतच आहेत.
6 फेब्रवारी रोजी कळवलेले मृत्यू
– नाशिक मनपा – 02
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00
नाशिक जिल्ह्याचे आजचे चित्र
– एकूण कोरोनाबाधित 4 लाख 72 हजार 326.
– 4 लाख 58 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात 4 हजार 801 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.31 टक्के.
इतर बातम्याः
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली